School Assessment : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांवर आधारित ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यादायी सवयींचे संस्कार रुजवण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन २०२६-२७ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
वैध 'युडीआयएसई-प्लस' कोड असलेल्या सर्व शासकीय, अनुदानित, खासगी, निवासी, आदिवासी आणि अल्पसंख्याक शाळांसाठी या अभियानात भाग घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
१ ऑगस्टपासून पोर्टल व अॅप होणार सुरू
केंद्र शासनाच्या १५ जुलैच्या पत्रानुसार, १ ऑगस्ट २०२६ पासून 'एसएचव्हीआर' पोर्टल आणि मोबाईल अॅप सुरू होणार आहे. या पोर्टलवर सर्व शाळांना आपली नोंदणी करून स्वमूल्यांकन करणे बंधनकारक असणार आहे. एसएचव्हीआर पोर्टल हे देशभरातील शाळांमधील पाणी, स्वच्छता, स्वच्छतेच्या सवयी आणि हरित उपक्रमांची माहिती एकत्र आणणारे एक महत्त्वाचे राष्ट्रीय व्यासपीठ ठरणार आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा व राज्य स्तरावर पुराव्यावर आधारित नियोजन, देखरेख आणि सुधारणा करणे अधिक सुलभ होणार आहे.
या ६ महत्त्वाच्या निकषांवर होणार मूल्यांकन
शाळांचे मूल्यांकन खालील ६ मुख्य घटकांच्या आधारे केले जाणार आहे. त्यात पाणीपुरवठा, स्वच्छ व सुरक्षित शौचालये/स्वच्छतागृहे, साबणासह हात धुण्याची सुविधा, परिसर स्वच्छता, वर्तन परिवर्तन व क्षमता विकास विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता, हरित व शाश्वत उपक्रमांची अंमलबजावणी यांचा समावेश आहे.
एनसीईआरटी आणि युनिसेफ देणार मार्गदर्शन
शाळा केवळ गुणवत्तेपुरत्या मर्यादित न राहता स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक बनविण्यावर या अभियानातून भर दिला जाणार आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एनसीईआरटी व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच शाळांना स्वमूल्यांकनाची प्रक्रिया, आवश्यक निकष आणि अचूक माहिती भरण्याबाबत योग्य ते प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.