Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी घडामोड घडली आहे. महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आलेली सुनीता आर. गावंडे यांची नियुक्ती राष्ट्रीय नेतृत्वाने अवघ्या २४ दिवसांत मागे घेतली आहे.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी २६ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला. त्यामुळे राज्यातील महिला काँग्रेसच्या संघटनात्मक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, २ नोव्हेंबर २०२६ रोजी सुनीता आर. गावंडे यांच्याकडे महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, नियुक्तीचा निर्णय झाल्यानंतर अवघ्या २४ दिवसांतच राष्ट्रीय नेतृत्वाने तो मागे घेतला. २६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, त्यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे.
सुनीता गावंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर आणि संघटनात्मक जबाबदारी पार पाडण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याची चर्चा होती. त्यातच आता राष्ट्रीय नेतृत्वाने नियुक्ती रद्द केल्याने या निर्णयामागे नेमके काय कारण आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, अलका लांबा यांनी जारी केलेल्या आदेशात नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय स्पष्ट करण्यात आला असला, तरी त्यामागील कारणांचा सविस्तर खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी आता कोणाकडे सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अवघ्या २४ दिवसांत नियुक्ती मागे घेण्याच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या निर्णयामुळे काँग्रेसमधील या घडामोडीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.