Maharashtra Cyber Action Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Cyber Action : 'कॉक्रोच'च्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई; 500हून अधिक संशयित सोशल मीडिया प्रोफाइल रडारवर

Maharashtra Cyber identifies 500+ suspicious accounts spreading AI-generated misinformation : 'कॉकरोच जनता पार्टी' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबरने 500 हून अधिक संशयित सोशल मीडिया प्रोफाइल, 429 आक्षेपार्ह पोस्ट आणि 140 हून अधिक डीपफेक कंटेंटची ओळख पटवल्याचा दावा केला आहे.

Pradeep Pendhare

Cockroach Janata Party Protest : 'कॉकरोच जनता पार्टी' या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या माहितीविरोधात महाराष्ट्र सायबरने मोठी कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

विभागाने 500 हून अधिक संशयित सोशल मीडिया प्रोफाइलची ओळख पटवली असून, आंदोलनाचा गैरफायदा घेत अफवा, चुकीची माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार करण्यात आलेला बनावट मजकूर प्रसारित केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र सायबरच्या (Cyber) माहितीनुसार, ओपन-सोर्स इंटेलिजन्स (OSINT), डेटा विश्लेषण, वर्तणूक अभ्यास आणि अत्याधुनिक AI फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही तपास मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक तपासात सुमारे 100 सोशल मीडिया खाती भारताबाहेरून, विशेषतः पाकिस्तान आणि पश्चिम आशियातील काही देशांतून चालवली जात असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

तपासादरम्यान इन्स्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर), फेसबुक आणि यूट्यूबवरील 429 आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्सची नोंद करण्यात आली. यापैकी 140 हून अधिक पोस्ट आणि प्रोफाइलमध्ये कृत्रिमरीत्या तयार केलेली गर्दीची दृश्ये, AI-आधारित आवाज आणि लोकप्रतिनिधींचे मॉर्फ केलेले डीपफेक व्हिडिओ वापरल्याचे महाराष्ट्र (Maharashtra) सायबरने म्हटले आहे.

या सर्व डिजिटल सामग्रीची महाराष्ट्र सायबरच्या ऑडिओ-व्हिडिओ फॉरेन्सिक टीमने वैज्ञानिक पडताळणी केल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित पोस्ट आणि खात्यांवर कारवाई करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना कायदेशीर प्रक्रियेनुसार नोटीस पाठविणे आणि संबंधित मजकूर हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे.

दरम्यान, या कारवाईबाबत महाराष्ट्र सायबरने जाहीर केलेली माहिती ही तपासाच्या प्राथमिक निष्कर्षांवर आधारित असून, संबंधित प्रकरणांमध्ये पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT