Maharashtra Drought Affected Farmers : हिवाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याच्या हालचाली सुरू केल्या दिसत आहे.
पहिला हप्ता म्हणून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा केल्यानंतर आता आणखी दोन हजार रुपयांचा हप्ता देण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या मदतीच्या निकषांत वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारला सुधारित प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात 304 दुष्काळी तालुक्यांत आणखी दहा तालुक्यांची भर पडणार आहे. या दहा तालुक्यांतील दुष्काळी शेतकऱ्यांसह ही आग्रीम हप्ता देण्याची तयारी असल्याचे सांगितले जाते. दिवाळीपूर्वी 304 दुष्काळी तालुक्यांत सुमारे एक कोटी पात्र बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा झाली आहे.
राज्यात दुष्काळी तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांची (Farmer) संख्या एक कोटी 31 लाख रुपये आहे. यातील सुमारे 10 लाख शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळालेली नाही. शेतकरी ओळख क्रमांक नसणे, सामाईक शेतजमीन, मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी महसूल दप्तरी आपल्या नावांची नोंद न करणे आदी कारणांमुळे ही मदत जमा झाली नसल्याचे पुढे आले आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांची मदत महायुती सरकारकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला किंवा सभागृहात दुष्काळीवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दुष्काळाच्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करताच त्यांची मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. तसेच वाढीव निकषांनुसार सुधारित प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, आठवड्याभरातच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर होईल, असे मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.