

Punjab Politics : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह', हे पुस्तक देशाच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदु ठरलं आहे. नवी दिल्ली येथे या पुस्तकाचे काल प्रकाशन झाले. यावेळी देशातील एकमेव भाजप नेत्याने हजेरी लावली.
माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची ही उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. ते काँग्रेसचे माजी नेते असून, पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सोनिया गांधी यांच्या कार्यक्रमाला त्यांची हजेरी ही, आगामी पंजाबच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा ठरू पाहत आहे.
अमरिंदर सिंह यांना विधानसभा 2022 मध्ये त्यांना, काँग्रेसने (Congress) पक्षाने पदावरून हटवले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांनी काल सोनिया गांधी यांच्या पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावल्याने ते पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे.
काँग्रेसमध्ये वापसीच्या चर्चा मात्र अमरिंदर सिंह यांनी फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले, "गांधी कुटुंबाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. आमचे नाते खूप घट्ट आहे. मी त्यांच्या सामील व्हावे की नाही, असे मला कोणीही विचारले नाही.सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हा सामाजिक कार्यक्रम होता. गांधी परिवाराशी माझे संबंध आहे. सोनिया गांधी यांनीही माझ्या पुस्तकांच्या प्रकाश सोहळ्याला हजेरी लावली होती." ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी अमरिंदर सिंह यांच्या उपस्थितीवर, मी त्यांना चांगले ओळखतो. ते काँग्रेससोबत असते तर, खूप बरे झाले असते.
पटियाला संस्थानच्या राजघराण्यात जन्मलेल्या अमरिंदर सिंह हे राजीव गांधी यांचे वर्गमित्र आहेत. राजीव गांधी यांनीच त्यांना काँग्रेसमध्ये आणले. 1980 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पतियाळा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला.
1998 मध्ये सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यांनी तीन वेळा पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 2002च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि ते पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री बनले. पक्षातील अंतर्गत कलहामुळे 18 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे भाजप प्रवेश 2022 मध्ये प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.