Maharashtra Drought News: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. सध्या ३५ टक्के क्षेत्राचे पंचनामे झाले असून शुक्रवारपर्यंत नुकसानीचे क्षेत्र आणि मदतीसाठी लागणारी अंदाजे रक्कम सरकारला कळवायची आहे. दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच मदत मिळणार आहे. विशेष बाब म्हणून तीन हेक्टर बाधित क्षेत्राला मदत दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्णयानुसार दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीत दोन हेक्टरपर्यंतच क्षेत्राला मदत दिली जाते. त्याच शासन निर्णयानुसार कोरडवाहू किंवा जिरायत पिकांसाठी हेक्टरी साडेआठ हजार रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार आणि बहुवार्षिक किंवा फळबागांसाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
तरीपण, मागच्या वर्षी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून तीन हेक्टर बाधित क्षेत्राला मदत दिली होती. या पार्श्वभूमीवर सध्या अधिकारी दुष्काळाने बाधित दोन आणि तीन हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करीत आहेत. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळाची दाहकता सर्वाधिक आहे. त्यामुळे अशा तालुक्यांमधील सरसकट शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत मिळू शकते, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकूण सरासरी क्षेत्र १४४.३६ लाख हेक्टर
यंदा खरीप पेरणी १४०.२६ लाख हेक्टर
अंदाजे बाधित क्षेत्र ९५ लाख हेक्टर
मदतीसाठी हेक्टरची मर्यादा २ हेक्टर
सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके असून जिल्ह्यातील सर्वच बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही शेतकऱ्यांनी वाया गेलली खरीप पिके काढून टाकली आहेत. अशा शेतकऱ्यांच्या रिकाम्या क्षेत्राचेही पंचनामे करायला सांगितले आहेत. गुरुवारपर्यंत पंचनामे होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.