PDCC Bank Election : ​पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट! भोरमध्ये 'थोपटे विरुद्ध थोपटे' सामना?

Sangram Thopte vs Nitin Thopte : संग्राम थोपटेंनी सलग तीन वेळा बँकेत प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन थोपटेंनी दंड थोपटलेत.
 Sangram Thopte
Sangram Thopte Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भोर तालुक्यात संस्था प्रतिनिधींच्या ठरावांवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या अ गटातून सलग तीन वेळा निवडून आलेले माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन थोपटे इच्छुक असल्याने भोरच्या राजकारणात ‘थोपटे विरुद्ध थोपटे’ अशी लढत चर्चेत आली आहे.

संग्राम थोपटे यांनी जिल्हा बँकेवर ‘अ’ गटातून सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन थोपटे यांनी ‘अ’ गटातून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भोरमधील सहकार क्षेत्रातील समीकरणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘ड’ गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भालचंद्र जगताप पुन्हा इच्छुक आहेत. जगताप यापूर्वी ‘ड’ गटातून एकदा, तर तज्ज्ञ संचालक म्हणून एकदा जिल्हा बँकेवर राहिले आहेत.

संस्थांचे ठराव मिळविण्यासाठी रस्सीखेच

भोर तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांसह अन्य सहकारी संस्थांमध्ये प्रतिनिधी ठरावासाठी मोठी राजकीय रस्सीखेच झाल्याचे चित्र आहे. काही संस्थांमध्ये प्रतिनिधी निवडीसाठी कार्यालयीन निवडणूक घेण्यात आली, तर काही ठिकाणी बिनविरोध ठराव करण्यात आले. काही संस्थांमध्ये संचालकांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे.

मतदार यादीत समावेशासाठी प्रतिनिधी ठराव देण्याची प्रक्रिया २२ सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानुसार भोर तालुक्यातील एकूण २०२ संस्थांपैकी १५६ संस्थांचे प्रतिनिधी ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.

 Sangram Thopte
PDCC Bank Election : पुणे जिल्हा बँकेत मातब्बर नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार : पवार, भरणे, वळसे-पाटील, दुर्गांडेंचा ‘बी प्लॅन’ तयार

साखर कारखान्यांत ३ पैकी २ संस्थांचे ठराव

अ वर्गातील ७५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांपैकी तब्बल ७४ संस्थांचे ठराव प्राप्त झाले आहेत. वाठार हिरामण संस्थेचा ठराव अद्याप आलेला नाही. आपटी विकास संस्थेकडून संचालक मंडळाचा एक आणि सभासदांच्या विशेष सभेचा एक, असे दोन प्रतिनिधी ठराव प्राप्त झाले आहेत. ब वर्गातील कृषी पणन संस्था, शेतीमाल प्रक्रिया, खरेदी-विक्री संघ आणि सहकारी साखर कारखान्यांपैकी ३ पैकी २ संस्थांचे ठराव आले आहेत.

क वर्गातील नागरी सहकारी बँका व पतसंस्थांमध्ये २९ पैकी २५ संस्थांचे ठराव प्राप्त झाले आहेत. तर ड वर्गातील ग्राहक संस्था, पाणीपुरवठा, गृहनिर्माण, औद्योगिक संस्था, दूध संस्था, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन आदी संस्थांपैकी ७७ पैकी ५५ संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत.

भोरच्या ४६ संस्था कुणाच्या बाजूने?

एकूण २०२ संस्थांपैकी १५६ संस्थांचे प्रतिनिधी ठरले असले, तरी ४६ संस्थांचे ठराव अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः ‘अ’ गटातील जवळपास सर्वच संस्थांचे ठराव प्राप्त झाल्याने या गटातील राजकीय हालचालींना अधिक महत्त्व आले आहे.

भोर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील या ठरावांनंतर आता संग्राम थोपटे, नितीन थोपटे आणि भालचंद्र जगताप यांच्या भूमिकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भोर तालुका कोणते नवे राजकीय समीकरण घडवतो, याची उत्सुकता आहे.

भोर तालुका : PDCC निवडणूक स्थिती

- अ गट : ७५ पैकी ७४ ठराव

- ब गट : ३ पैकी २ ठराव

- क गट : २९ पैकी २५ ठराव

- ड गट : ७७ पैकी ५५ ठराव

- एकूण : २०२ पैकी १५६ ठराव

- प्रलंबित : ४६ संस्थांचे ठराव

 Sangram Thopte
PDCC Bank : पुणे जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय खेळ सुरू; ‘आपला माणूस’ बसवण्यासाठी सोसायट्यांमध्ये रस्सीखेच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com