Eknath Shinde| Devendra Fadnavis |Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Election 2024 Final Results LIVE : महायुतीची 200 पेक्षाही अधिक जागांवर आघाडी; भाजपचं तिसऱ्यांदा शतक होणार?

Maharashtra Election LIVE vote Counting : दुसरीकडे अनेक अटीतटीच्या लढतीतही महायुतीचं पारडं जड दिसून येत आहे. आज सकाळी मतमजोणीला सुरुवात झाल्यापासूनच कलांमध्ये महायुतीने बहुमताचा आकडा पार केलेला दिसत आहे.

Mayur Ratnaparkhe

Maharashtra election results 2024 : विधानसभा निवडणुकीचे कल हाती येत असून, त्यानुसार महायुतीने तब्बल द्विशतकाचा टप्पा गाठला आहे. तर महायुतीमधील आणि एकूणच सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरणाऱ्या भाजपने शतकाचा टप्पा तिसऱ्यांदा गाठला आहे. दुसरीकडे महाविआची स्थिती अतिशय केविलवाणी दिसून येत आहे. कारण तिन्ही पक्ष मिळून एकूण आघाडी असणाऱ्या जागांची संख्या कशीबशी ५०च्या पुढे गेली आहे.

महायुतीला मिळत असलेलं हे बहुमत हे लाडकी बहीण योजनेचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. दुसरीकडे अनेक अटीतटीच्या लढतीतही महायुतीचं पारडं जड दिसून येत आहे. आज सकाळी मतमजोणीला सुरुवात झाल्यापासूनच कलांमध्ये महायुतीने बहुमताचा आकडा पार केलेला दिसत आहे.(Maharashtra Election Assembly 2024 news)

महाराष्ट्राच्या भवितव्याचा फैसला करणारी ही निवडणूक होती. या निवडणुकीचा निकाल समोर येत असून यातून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचं दिसून येत आहे. यामुळे एकूणच महाविकास आघाडीला(MVA) आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुतीवर आणि भाजपवर मोठा आरोप केला आहे. हा निकाल पैशांच्या बळावर लावून घेतला असल्याचं म्हटलं आहे. (Vidhan Sabha Election 2024 result live news)

तर दुसरीकडे महायुतीच्या गोटात जल्लोषाचं वातावरण सुरू आहे. महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते फटाके फोडत आहेत. ढोल वाजवत आहे आणि गुलालाही उधळत आहेत. याशिवाय जय श्रीरामच्या घोषणाही जागोजागी दिल्या जात आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT