Dhananjay Munde And Ajit Pawar .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde: 'काहीतरी काम द्या' म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची मागणी अखेर पूर्ण! अजितदादांनी सोपवली महत्वाची जबाबदारी

Maharashtra Election 2025: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत प्रचारासाठी मंत्रि‍पद नाकारलेल्या 3 आमदारांना 'स्टार' जबाबदारी देण्यात आली आहे.

Amit Ujagare

Dhananjay Munde: सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड या मित्रामुळं अडचणीत आलेले तसंच कृषी खात्यातील २०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी ऑफिस ऑफ प्रॉफिटमुळं मंत्रीपद गमवावं लागलेल्या धनंजय मुंडे निवांत होते. पण याच निवांतपणाला कंटाळलेल्या मुंडेंनी एका जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अन् राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडं आपल्याला काम द्या अशी मागणी केली होती. त्यांची ही मागणी अखेर अजित पवारांनी पूर्ण केली आहे.

मंत्रीपद गमावल्यानंतर धनंजय मुंडे यांनी 'मला काहीतरी काम द्या' अशी मागणी केली तेव्हा मुंडेंना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण ही केवळ चर्चाच ठरली होती, मुंडेंना पुन्हा मंत्रीपदी बसवण्याबाबत अजित पवारांनी सावध पवित्रा घेतला होता. पण आता त्याच धनंजय मुंडेंना अजित पवारांनी कामाला लावलं आहे. सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार सुरु झाला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत धनजंय मुडेंचा समावेश करण्यात आला आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीत ५ व्या क्रमांकावर धनंजय मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. म्हणजेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ या वरिष्ठ नेत्यांनंतर धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक म्हणून स्थान देण्यात आलं आहे, अशा एकूण ४० स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केली आहे. यामध्ये मंत्रीपद नाकारलेल्या काही आमदारांचाही समावेश आहे. म्हणजेच त्यांना आता पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मंत्रीपद नाकारलेल्यांना 'स्टार' जबाबदारी

दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मंत्रीपद नाकारलेल्या तीन आमदारांचा समावेश आहे. यामध्ये धर्मारावबाबा आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT