Maharashtra Election 2025: राज्यात तब्बल १९ लाख नव्या मतदारांची नोंद! सर्वाधिक ठाण्यात तर पुण्यात...

Maharashtra Election 2025: महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरु आहे. या मिनी विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांची अन् मतदारांची देखील लगबग सुरु झाली आहे.
Voter
Voter Shivsena
Published on
Updated on

Maharashtra Election 2025: महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरु आहे. या मिनी विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांची अन् मतदारांची देखील लगबग सुरु झाली आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या सात महिन्यात या निवडणुकांसाठीच तब्बल १९ लाख नव्या मतदारांची भर पडली आहे. त्यातही ठाण्यात सर्वाधिक मतदारांची नोंद झाली असून त्याखालोखाल पुणे जिल्हा आणि मुंबई उपनगरात सर्वाधिक मतदार नोंदणी झाली आहे.

Voter
Bihar Election 2025: बिहारच्या जात राजकारणाचं गणित तेजस्वी यादवांच्या पथ्यावर पडणार? कसा होऊ शकतो फायदा?

नेमकी आकडेवारी किती?

गेल्या सात महिन्यात राज्यात १९ लाख नव्या मतदारांची नोंद झाली आहे. तर ४ लाख नावं वगळण्यात आली आहेत. त्यामुळं गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुमारे १४ लाख ७१ हजार मतदारांची भर पडली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख २५ हजार मतदारांची भर पडली आहे. त्यानंतर पुणे जिल्हा आणि मुंबई उपनगरामध्ये सर्वाधिक नोंद झाली आहे.

Voter
Pune Land Scam: पुण्यात आणखी एका सरकारी जमिनीचा घोटाळा! 15 एकर जमीन परस्पर विकली; सहाय्यक दुय्यम निबंधनकाचं निलंबन

नगरपंचायतींसाठी मतदान

दरम्यान, राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली असून या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. यानंतर येत्या २ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. यानंतर लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. तर शेवटी पुढील वर्षात जानेवारी महिन्यांत महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. जानेवारी २०२६ अखेर पर्यंत संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com