Children in Poll Campaigns Sarkarnama
महाराष्ट्र

Criminal Action By Election Commission : खबरदार उमेदवारांनो! 14 वर्षांखालील मुलांचा प्रचारासाठी वापर कराल, तर...

Election Commission Warns Criminal Action Over Use of Children in Poll Campaigns : सध्या महापालिका किंवा अन्य कोणत्याही निवडणुकांमध्ये 14 वर्षांखालील मुलांचा प्रचारात समावेश केल्यास आढळल्यास फौजदारी कारवाई होणार आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra municipal elections : राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वाटेल ते करत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. पायाला भिंगरी लावून प्रचाराचा तोफा डागत आहे. कुठेही कमी पडायला नको म्हणून, नातेवाईक, मित्र, मित्रांचे मित्र, बाहेर गावाहून माणसं बोलावून प्रचार सुरू केला आहे.

यातच लहान मुलांना देखील प्रचारात उतरवल्याचे प्रकार होत आहे. पण कायद्यानुसार त्याला मनाई आहे. विशेषतः पाच ते 14 वर्षांखालील मुलांना प्रचारात उतरवल्याचे दिसते आहे. यावर आता प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आलं आहे. थेट फौजदारी कारवाई करण्याचा, इशारा दिला आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये (Municipal Election) शालेय विद्यार्थी आणि विशेषतः पाच ते 14 वर्षांखालील मुलांचा महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्रासपणे वापर केला जात आहे. यात अनेक प्रमुख राजकीय पक्षांसोबत अपक्षांचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने तसं निरीक्षण देखील नोंदवलं आहे.

केंद्र सरकारच्या (Central Government) बाल आणि किशोरवयीन कामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा, 1986 (सीएलपीआर कायदा) नुसार, 14 वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती ही किशोरवयीन मुलगा म्हणून गणला जातो. यामुळे या वयातील मुलांना कोणत्याही घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आदी कामांसाठी ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

तर असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा करण्याच्या तरतूद यात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांच्या प्रचारांमध्ये विविध राजकीय पक्षांकडून आपल्या प्रचाराचे वातावरण तयार करण्यासाठी 14 वयाखालील मुलांच्या हातात झेंडे दिले जात असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, यात कोणी आक्षेप घेऊ नये, म्हणूनही अनेक पक्षांच्या प्रतिनिधींकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान राजकीय पक्षांनी लहान मुलांचा आपल्याकडून अनवधानाने वापर होत असेल, तर तो तत्काळ थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज राष्ट्रीय गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष प्रल्हाद गवारे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोग देखील याबाबत गंभीर असल्याचं सूत्रांची माहिती आहे. किशोरवयीन मुलं प्रचारात आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाईचा प्रशासनाने इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी किशोरवयीन मुलांना प्रचारापासून लांब ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT