Imran Pratapgarhi AIMIM criticism : 'AIMIM'मुळे मुस्लिमांचे नेतृत्व कमजोर; इम्रान प्रतापगढी यांनी ओवैसींच्या 'पंतग'चा 'मांजा' कोणाचा, सांगून टाकलं!

Ahilyanagar Municipal Election: Congress Imran Pratapgarhi Criticises AIMIM Owaisi in Mukundnagar Rally : अहिल्यानगर महापालिकेच्या मुकुंदनगर उपनगरात काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी सभा घेऊन 'AIMIM'वर निशाणा साधला आहे.
Imran Pratapgarhi
Imran PratapgarhiSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत काँग्रेस अन् महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी त्यांची मुलुख मैदान तोफ खासदार इम्रान प्रतापगढी यांना उतरवलं आहे.

खासदार प्रतापगढी यांनी पहिल्याच सभेत 'AIMIM'वर जोरदार हल्ला चढवला. 'AIMIM'चे असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाता पंतग अन् मांजा कोणाचा आहे, हे सांगून टाकलं आहे. 'पतंग जरी, 'AIMIM'चे असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचा असला, तरी त्याचा मांजा हा सताधाऱ्यांचा आहे, हे मुस्लिम समाजाने समजून घ्यावं,' असं आवाहन इम्रान प्रतापगढी यांनी केलं.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी खासदार इम्रान प्रतापगढी यांची सभा झाली. महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी सभेला उपस्थित होते. द्वेषाचं राजकारण, मराठी माणसांत फूट, जाती-धर्मावरून द्वेष पसरविणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सुडबुद्धीच्या राजकारणावर खासदार प्रतापगढी यांनी जोरदार हल्ला चढवला.

खासदार इम्रान प्रतापगढी म्हणाले, "देश प्रेम, सद्‍भावना आणि एकतेच्या बळावर उभा आहे. परंतु सध्याचे सत्ताधारी प्रत्येक ठिकाणी द्वेष आणि समाजात फूट पाडणारी भाषा वापरून लोकांना विभागण्याचे, भडकवण्याचे काम करत आहेत. राजकारणाच्या स्टेजवरून धर्माच्या गोष्टी करू नयेत. काँग्रेस हा पक्ष समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालतो, देशात भाईचारा आणि सद्‍भावना वाढविण्याचे कार्य पक्ष करत आहे."

Imran Pratapgarhi
Eknath Shinde betrayal : '400 वर्षानंतरही गद्दारीचा डाग पुसला जात नाही, तर यांच्या किती पिढ्या..'; ठाकरेंनी शिंदेच्या 'वर्मी घाव' घातला

निवडणुकीत दिशाभूल करणारे मुद्दे

'ही निवडणूक शहराच्या विकासाची व स्थानिक प्रश्‍नांची आहे. ही पहिली अन् शेवटची संधी आहे. मात्र दुर्दैवाने इतर पक्षांचे नेते राष्ट्रीय स्तरावरील मुद्दे पुढे करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शहराचे पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्‍नांपासून जनतेचे लक्ष हटविणे ही बाब दुर्दैवी आहे,' असे इम्रान प्रतापगढी यांनी म्हटले.

Imran Pratapgarhi
Girish Mahajan : तीन मिनिटांच्या भाषणात गिरीश महाजन गरजले, थेट शरद पवारांनाच दिले चॅलेंज!

निधी मिळवून देण्याचं आश्वासन

'जनतेने अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडू नये. अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी स्थानिक सत्ताधाऱ्यांनी निधी दिला नाही, तर मी माझ्या खासदार निधीतून विकासकामांसाठी मदत करेन. एवढेच नाही तर इतर खासदारांचा निधीही अहिल्यानगर शहरासाठी मिळवून देईल. काँग्रेस हा पक्ष केवळ एका समाजाचा नाही, तर सर्व समाजांचा आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि युवक- युवती यांना न्याय देणारा काँग्रेस हा पक्ष आहे,' अशी ग्वाही प्रतापगढी यांनी दिली.

'AIMIM'च्या पंतगीचा मांजा कोणाचा?

'AIMIM'मुळे देशात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाचे मोठे नुकसान होत आहे. समाजाचे तथाकथित हितचिंतक असल्याचे भासवून, जिथे जिथे समाजाचे नेतृत्व मजबूत आहे, तिथे जाऊन त्या नेतृत्वाची ताकद कमी करण्याचे काम 'AIMIM'कडून केला जात आहे. परिणामी समाजातील प्रबळ नेत्यांचा पराभव होतो आणि त्याचा थेट फटका समाजाच्या प्रगतीला बसतो, ही बाब समाजासमोर स्पष्ट पुराव्यांसह आली आहे. 'पतंग' जरी 'AIMIM'चे असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचा असला, तरी त्याचा 'मांजा' हा सताधाऱ्यांचा आहे,' असा टोला खासदार इम्रा प्रतापगढी यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com