Bhagat Singh Koshyari Sarkarnama
महाराष्ट्र

Modi Government Padma Award : ‘अपमानाचा सन्मान’ भाजपचा कारनामा! कोश्यारींना 'पद्म'वरून राऊत आगपाखड

Bhagat Singh Koshyari Gets Padma Award Sanjay Raut Slams Modi Govt Maharashtra Politics : महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पद्म पुरस्कार जाहीर होण्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

Pradeep Pendhare

Padma Award controversy : केंद्रातील भाजप मोदी सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

'महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान!,' असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यांनी याबाबत 'एक्स'वर पोस्ट केली आहे.

देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मानासाठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. देशातील 131 जणांना पुरस्कार जाहीर करताना, महाराष्ट्रातील नऊ जणांचा त्यात समावेश आहे. या पद्म भूषण पुरस्कारासाठी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची निवड करण्यात आली आहे. यावरून शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संपात व्यक्त केला आहे.

“महाराष्ट्रात (Maharashtra) लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते! छान”, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

भगत सिंह कोश्यारी हे 2019 ते 2023 या दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. भगत सिंह कोश्यारी राज्यपाल असताना त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. भगत सिंह कोश्यारी यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. आता याच भगत सिंह कोश्यारी यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

समांतर सरकार चालवण्याचा आरोप

मुंबई, महाराष्ट्र, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले इत्यादींवर भगत सिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना, राज्यपाल कोश्यारींवर ‘समांतर सरकार’ चालवत असल्याचाही आरोप होत होते.

मुंबईबद्दल वादग्रस्त विधानावरून वादंग

'गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही', ‘समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, कल्पना करा की सावित्री बाईंचं लग्न 10 वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतिचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? असे वादग्रस्त विधान केले.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला," असं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात , "शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकरा यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील," असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT