Farmer's News: महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि त्यासंदर्भातील नैसर्गिक आपत्तीमुळं ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्यानुसार, बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी शासनानं मंजूर केला आहे. याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
जून आणि जुलै २०२६ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.
त्याचबरोबर चालू हंगामात यापूर्वी शेतपिकांच्या नुकसानीसाठी वितरित करण्यात आलेल्या मदतनिधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी, असंही या शासन निर्णयात म्हटलं आहे. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणं निश्चित केलेल्या दरानं मदत देण्यात येत असल्याची अधिकाऱ्यांनी खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती (डबल) होणार नाही, याची तहसीलदारांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयानं कटाक्षानं काळजी घ्यावी, असे निर्देशही यात देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.