Devendra Fadnavis Sarkarnama, AI Generated Image
महाराष्ट्र

CM Announcement Women Committee : महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांकडून 'महिला सदस्य समिती'ची घोषणा!

Women member committee for security and empowerment : महिलांच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने महिला सदस्य समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. जाणून घ्या या महत्त्वाच्या निर्णयामागील उद्दिष्टे आणि प्रमुख बाबी.

Rashmi Mane

Devendra Fadnavis : राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नाला गांभीर्याने घेत सरकारने पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खासगी कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या छळाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विद्यमान कायद्यांचा सखोल आढावा घेऊन आवश्यक बदल सुचविण्यासाठी विधिमंडळातील महिला सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे.

विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांतील महिला सदस्यांचा या समितीत समावेश असेल. महिलांवरील अत्याचार, कार्यस्थळी होणारा छळ, सुरक्षाविषयक नियम तसेच अंमलबजावणीतील त्रुटी यांचा अभ्यास करून समिती सरकारला शिफारशी सादर करणार आहे. त्यानुसार आवश्यक सुधारणा करण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली आहे.

विधानपरिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान नाशिकमधील एका आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक आणि मानसिक छळाच्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सदस्य चित्रा वाघ, डॉ. नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून आतापर्यंत 9 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तक्रारीवर तातडीने कारवाई न केल्याचा आरोप असलेल्या संबंधित व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

या संपूर्ण तपासात संबंधित कंपनीने यंत्रणांना सहकार्य केले असून कंपनीचा थेट सहभाग आढळून आलेला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, एकाच घटनेच्या आधारे देशातील आघाडीच्या आयटी कंपनीच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने चौकशी अंतिम टप्प्यात आणली असून आरोपपत्रे दाखल झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. तसेच सोलापूर आणि तळेगाव दाभाडे येथील तक्रारींचीही वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT