DCC Bank News : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. नोकरभरतीत आता स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. यानुसार, संबंधित जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.
सहकार व पणन विभागाच्या शासन निर्णयानुसार, संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्रातील अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असलेल्या ७० टक्के उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्राधान्य मिळणार आहे. उर्वरित ३० टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. मात्र, बाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भरता येणार आहेत.
राज्यात सध्या ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत असून, या बँका जिल्हास्तरावर शेतकऱ्यांना पीककर्ज आणि सहकारी संस्थांना आर्थिक मदत पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. नोकरीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास ग्राहक, सभासद आणि ठेवीदारांना अधिक प्रभावी सेवा देता येईल, असा सरकारचा दावा आहे.
विशेष म्हणजे, ज्या बँकांनी या शासन निर्णयापूर्वी भरती जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत, त्यांनाही हा निर्णय लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ज्या जिल्हा बँकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे किंवा स्थगित आहे तिथे आणि यापुढे जिथे भरती प्रक्रिया सुरु होईल तिथे हा निर्णय लागू होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.