Maharashtra Government News: राज्य सरकारच्या दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयाकडून जनगणना कामाबाबत एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, दिव्यांग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जनगणनेच्या कामातून वगळण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
३० एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या पत्रात सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील दिव्यांग कर्मचारी/अधिकाऱ्यांना जनगणना काम देऊ नये, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामागे दिव्यांग हक्क कायद्याचा आधार देण्यात आला असून, दिव्यांग कर्मचाऱ्यांना भेदभावमुक्त व सन्मानजनक वागणूक देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
मात्र, काही ठिकाणी या सूचनांचे पालन होत नसल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांनी याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यापुढे जर कोणत्याही दिव्यांग कर्मचाऱ्याला जनगणनेचे काम दिले गेले, तर त्यावर नियमांनुसार कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जनगणना प्रक्रियेसाठी शिक्षक, सरकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याची मोहीम सुरू आहे. काही ठिकाणी गैरहजेरीबाबत कडक भूमिका घेतली जात आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय काम असून त्यात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. जे शिक्षक, कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाला दांडी मारली आहे, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात मुख्याध्यापकासह 8 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.