Ladki Bahin Yojana payment delay Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : पुरुषांसारखी लाडक्या बहिणींची नावं, सरकार अलर्ट! e-kyc ला मुदतवाढ मिळणार?

possibility to Ladki Bahin Yojana eKYC deadline extension : राज्यातील लाडक्या बहिणींनी मोठा दिलासा मिळणारी माहिती आली असून eKYC साठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

Aslam Shanedivan

  1. पुरुषांसारखी नावं असलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची घरोघरी पडताळणी केली जाणार आहे.

  2. ई-केवायसीत चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थ्यांचीही तपासणी होणार असून दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

  3. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर थकित डिसेंबर हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार आहेत.

Ladki Bahin Yojana News : राज्यात सध्या निवडणुकांचा माहौल असून जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. पण या दरम्यान लाखो महिलांनी eKYC न केल्याने किंवा eKYC करताना चूक झाल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा लाभ मिळालेला नाही. यावरून महिलांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले असतानाच आता महिलांची प्रत्यक्ष पडताळणी सुरु करण्यात आली असून या पडताळणीत धक्कादायक माहिती समोर आले आहे. ज्यात अनेक महिलांची नावे ही रोशन, किरण, शशी अशी पुरूषांसारखी असल्याचे उघड झाले आहे. यामुळे प्रत्यक्ष पडताळणी करताना अडचणींचा सामना अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे. यामुळे सरकार अलर्टमोडवर आले असून eKYC साठी देखील मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.

राज्यातील महिलांना आर्थीक हातभार लागावा, त्यांच्या अडचणी सुटाव्यात यासाठी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत लाभार्थ्यी महिलांना प्रतिमाह १५०० रूपये दिले जातात. तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आणि कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरदार नसावा अशी अट या योजनेसाठी आहे.

दरम्यान या योजनेचा लाभ काही सरकारी नोकरदार महिलांसह पुरूष घेत असल्याचे मध्यंतरी समोर आले होते. जवळपास १४ हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. ज्यानंतर अशा महिला आणि पुरूषांचा शोध घेण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत घेतलेला लाभ देखील वसूल करण्यात आला. पण आता अंगणवाडी सेविकांकडून होणाऱ्या पडताळणीत बऱ्याच महिलांची नावे ही पुरुषांच्या नावासारखीच असल्याचे समोर आले आहे. यामुळे पडताळणीत अडचणी येत आहेत.

अनेक महिलांची नावे ही रोशन, किरण, शशी, माही अशी असून ही नावे नक्की पुरुषांची आहेत की महिलांची असा प्रश्न सरकारला पडला आहे. यामुळेच आता अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. घरोघरी जाऊन नक्की महिलाच लाभ घेत आहेत का,याची पडताळणी करत आहेत.

केवायसीला अजून एक संधी

दरम्यान लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसीमधील चूक सुधारण्यासाठी शेवटची संधी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत सत्ताधारी आमदारांनी देखील मागणी केली आहे. तर अनेक महिलांनी ३१ डिसेंबरआधी केवायसी केलेले नसून अनेक महिलांनी प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली आहेत. ज्यामुळे त्यांना डिसेंबरचा लाभ मिळालेला नाही.

या प्रकरणानंतर राज्यभर लाडक्या बहि‍णींनी संताप व्यक्त करत आंदोलन केले आहे. तसेच केवायसीला अजून एक संधी द्यावी अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर आता केवायसीतील दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर आता या योजनेतील अडचणींची सोडवणून करण्यासाठी सरकारने हेल्पलाईन सुरू केली आहे.

FAQs :

1) लाडकी बहीण योजनेत पडताळणी का केली जाणार आहे?
👉 पुरुषांसारखी नावं असलेल्या लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी पडताळणी केली जाणार आहे.

2) कोणत्या माध्यमातून पडताळणी होणार आहे?
👉 अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे.

3) ई-केवायसीत चूक झाली असेल तर काय करायचं?
👉 सरकारकडून दुरुस्तीची सुविधा आणि मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

4) डिसेंबरचा हप्ता का मिळाला नाही?
👉 ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना हप्ता मिळाला नाही.

5) पैसे कधी मिळणार?
👉 ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थकित हप्त्याचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT