Maharashtra Drought Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra drought situation : राज्यावरील दुष्काळाचे संकट गडद! सरकारने निवडणूक आयोगाला केले जागे

Rajanand More

Maharashtra Government News : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे संकट (Maharashtra drought situation) अधिकच गडद होत चालले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतेक धरणं कोरडी पडू लागली असल्याने राज्यातील जनता हवालदिल झाली आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी राज्यभरात हजारो टॅंकर सुरू आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) आचारसंहितेमुळे मदत करण्यात अनेक अडचणी येत आहेत.

राज्यात लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे होते. पाचव्या टप्प्याची मतदान (Voting) प्रक्रिया तीन दिवसांपुर्वीच पूर्ण झाली. मात्र, देशात सात टप्पे असून सातव्या टप्प्याचे मतदान 1 जूनला आहे. तर चार जूनला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत देशात आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू असणार आहे. या कारणाने महाराष्ट्रात सरकारला दुष्काळासंबंधी उपाययोजना करण्यात अडचणी येत आहेत. (Latest Political News)

दुष्काळाबाबत विविध उपाययोजना करणे तसेच याबाबत सध्या सुरू असल्या वेगवेगळ्या योजनाही पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आचारसंहिता शिथिल होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) विनंती केली आहे. आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी सरकारने केली आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतेक धरणे शंभर टक्के भरलीच नाहीत. त्यामुळे पावसाळ्यातही राज्याच्या काही भागात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता हे संकट अधिकच गडद झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागासह अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावे लागले आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT