SDRF Team : प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. या अपघातामध्ये एसडीआरएफ पथकातील तिघा जवानांचा मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळ ही घटना घडली. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.22) दोन तरुण प्रवरा नदीत बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला. तर, दुसऱ्याचा शोध सुरु होता. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ पथकाला बोलवण्यात आले होते. बुडालेल्या तरुणाचा शोध घेताला एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. मात्र बोट उलटल्याने पथकातील तिघांचा मृत्यू झाला. पथकात असेल्या इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली. घटनास्थळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दाखल झाले होते.
मंगळवारी (ता.21) उजनी धरणात अशीच दुर्घटना घडली होती. प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटून आठ प्रवासी बुडाले होते. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या अवघ्या दोन दिवसांनी प्रवरा नदीत एसडीआरएफ SDRF पथकातील जवानांची बोट उलटून झालेल्या अपघात झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जवान बुडाल्याची माहिती मिळताच आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी ट्विट करत मृत्यू झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उजनी धरणात बोट बुडाल्याने बेपत्ता झालेल्या सहा जणांचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुखःद आहे. तर नदीत बुडालेल्याचा शोध घेताना प्रवरा नदीत बोट उलटून एसडीआरएफच्या बचाव पथकातील तीन जवानांचा मृत्यू झाल्याची बातमीही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. यातील सर्व मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.भावपूर्ण श्रद्धांजली!
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.