बातमीतील ठळक मुद्दे:
राज्य सरकारनं दिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2,000 रुपयांची भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी सरकारकडून एकूण 40.61 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा निर्णय जाहीर करत, सेविकांच्या योगदानाचा गौरव असल्याचं सांगितलं.
Mumbai News: दिवाळीसण जवळ येत असल्याची चाहूल लागताच सर्वच सरकारी आणि बिनसरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष हे बोनसच्या घोषणेकडे लागलेले असते. राज्य सरकारकडूनही दरवर्षी सर्वच विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली जाते. याचदरम्यान, महायुती सरकारनं (Mahayuti Government) दिवाळी बोनसबाबत पहिला मोठा निर्णय घेतला आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी (ता.26) अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याबाबत मोठी घोषणा केली आहे.राज्य सरकारने दिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपयांची भाऊबीज म्हणून भेट देण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या,एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासाठी एकूण 40.61 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
आदिती तटकरे यांनी महिला व बालकांच्या संगोपन,पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस या महत्वाची सेवा बजावत असल्याचे कौतुकोद्गार काढले.तसेच त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी सरकारनं भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केल्याचंही त्यांनी म्हटलं.
भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना लवकरच वितरित करण्यात येणार असून या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल,असंही मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
अंगणवाडी सेविका खऱ्या अर्थानं फिल्डवर काम करत असतात.सरकारकडून त्यांच्या मेहनतीची वेळोवेळी दखलही घेतली गेली आहे. सरकारच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांची दिवाळी जशी बोनसमुळे गोड होते, त्याचसोबत आता अंगणवाडी सेविका व मदतनीसांचीही दिवाळी गोड होणार असल्याचं मत मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.
प्र.१: राज्य सरकारनं दिवाळीसाठी कोणता निर्णय घेतला?
उ.१: अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2,000 रुपयांची भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला.
प्र.२: या निर्णयासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे?
उ.२: एकूण 40.61 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्र.३: भाऊबीज भेट कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे?
उ.३: एकात्मिक बाल विकास सेवेत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ही भेट मिळणार आहे.
प्र.४: सरकारनं हा निर्णय का घेतला?
उ.४: अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि दिवाळीचा आनंद वाढवण्यासाठी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.