Health Department Recruitment 2026 Sarkarnama
महाराष्ट्र

Health Department Recruitment 2026 : राज्याच्या आरोग्य विभागात मोठी अपडेट; 5 हजार रिक्त पदांच्या भरतीला वेग, 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचा आदेश

Maharashtra government speeds up recruitment for 5000 health department vacancies, including doctors and community health officers : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने आरोग्य विभागातील तब्बल पाच हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला वेग देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Pradeep Pendhare

Government Hospital Recruitment Maharashtra : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने आरोग्य विभागातील तब्बल पाच हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला वेग देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मंत्रिमंडळाने नव्या पदांना मंजुरी दिल्यानंतर या आठवड्यात भरती प्रक्रिया गतिमान केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, डॉक्टर्स डेच्या पार्श्वभूमीवर 1400 डॉक्टरांच्या नियुक्ती आदेशांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे.

यासोबतच उच्च न्यायालयाच्या (Court) निर्देशांनुसार 1900 समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) पदांची भरती प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील अनेक उपजिल्हा रुग्णालयांच्या इमारती पूर्ण असूनही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सेवा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. मात्र नव्या पदभरतीनंतर या रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि इतर सुविधा उपलब्ध करून सेवा अधिक प्रभावी करण्याचा सरकारचा मानस असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

रुग्णालय बांधकामांना निधी प्राधान्य

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयांसाठी रखडलेला निधीही आठवडाभरात वितरित केला जाणार असून 50, 70, 75 आणि 90 टक्के काम पूर्ण झालेल्या रुग्णालय बांधकामांना प्राधान्याने निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी निधी वाढविण्याच्या दृष्टीने स्वतंत्र समिती स्थापन करून त्याचा आढावा घेतला जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

प्रलंबित देयके देणार

कोरोना काळात सेवा बजावलेल्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके प्राधान्याने अदा केली जातील, अशी ग्वाहीही मंत्री आबिटकर यांनी दिली.

दोन ते तीन संस्था ब्लॅकलिस्ट

याशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन, पीएफ आणि ईएसआयसी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर सरकारने कठोर भूमिका घेतली असून दोन ते तीन संस्थांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. गरज पडल्यास अशा एजन्सींविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचाही इशारा सरकारने दिला आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ही भरती मोहीम महत्त्वाची मानली जात असून, आगामी काळात सरकारी रुग्णालयांमधील मनुष्यबळाची मोठी समस्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT