Satyajeet Tambe : ग्रामीण भागात डॉक्टर गेलेच पाहिजेत! तांबे यांच्या सवालावर आबिटकरांचा कठोर निर्णय

Health Minister Prakash Abitkar responded in the Maharashtra legislature after MLC Satyajeet Tambe raised the issue of increasing doctors in rural areas : ग्रामीण भागात डाॅक्टरांनी थांबून प्रॅक्टिस करण्यासाठी कठोर नियम करण्याची मागणी नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळात केली.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Rural Doctors Maharashtra : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी, विधिमंडळात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष वेधताना, डाॅक्टरांना ग्रामीण भागात प्रॅक्टिस करण्याची अनिवार्य करण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणासाठी तसा कठोर नियम करून, निर्णय घ्यावा, असेही म्हटले.

यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी, ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात इंटर्नशिप करू, तसंच ग्रामीण आणि आदिवासी भागात इंटर्नशिप करणाऱ्या डाॅक्टरांच्या मानधनात देखील वाढ करू, असे स्पष्ट केलं.

नाशिक पदवधीरचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेकडे विधिमंडळात लक्ष वेधलं. WHO (World Health organisation) च्या जागतिक मानकांनुसार 1000 नागरिकांमागे 1 डॉक्टर असणे अपेक्षित असताना भारतात सध्या साधारण 850 नागरिकांमागे 1 डॉक्टर उपलब्ध आहेत. ही चांगली बाब आहे, अशी टिप्पणी सत्यजीत तांबे यांनी केली.

भविष्यात आणखी डाॅक्टरांची संख्या वाढून ती 700 डाॅक्टरांमध्ये (Doctor) 1 होईल. आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागात डॉक्टर उपलब्ध होण्याची समस्या अद्याप गंभीर आहे, याकडे सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधले.

Satyajeet Tambe
Abhishek Kalamkar : अभिषेक कळमकर 'त्या' वाहनात? पारनेरमध्ये पाठलागाचा थरार; शेवटी पोलिसांच्या हाती काय लागलं?

वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून डॉक्टरांसाठी ग्रामीण भागातील इंटर्नशिप अनिवार्य करण्याबाबत धोरण ठरवावे, अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली. तसेच संगमनेर इथल्या महिला रुग्णालयाच्या प्रलंबित कामाबाबतही सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Angry controversy : विखेंच्या नातवा जवळून गेलेला बिबट्या, तांबेंनी सांगितली घटना; मोर्चासमोर न येणाऱ्या प्रांताधिकाऱ्यावरून उपअधीक्षकांना झाप-झाप झापलं!

मंत्री आबिटकर यांनी सत्यजीत तांबे यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. सकारात्मक प्रतिसाद दिला. ग्रामीण व आदिवासी भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना अधिक प्रोत्साहन देण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगितले. याबाबत लवकर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसंच ग्रामीण अन् आदिवासी भागात प्रॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.

संगमनेरमध्ये 2020 मध्ये महिला रुग्णालय मंजूर झाले होते. या रुग्णालयासंदर्भात पुढे बैठक घेणार का? यावर मंत्री आबिटकर यांनी, संगमनेरमधील रुग्णालयासंदर्भात अधिवेशन काळात बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com