Sikandar shaikh arrest.jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Sikander Shaikh Arrest कुस्ती क्षेत्र हादरलं! महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी ठोकल्या बेड्या; धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Kesari Sikander Shaikh Arrest महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा असलेल्या सिकंदर शेखला अटक करण्यात आल्यामुळे कुस्तीक्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Deepak Kulkarni

संदीप शिरगुप्पे

Kolhapur News: महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेल्या कुस्तीपटू सिकंदर शेख याच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पंजाब पोलिसांनी कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे. पपला गुर्जर टोळीला शस्त्रपुरवठा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी कुस्तीपटू सिकंदर शेखसह (Sikandar Shaikh) पंजाब पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे कुस्तीक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना हरियाणा आणि राजस्थानात कार्यरत असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीला आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणत पंजाबमध्ये पुरवत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पंजाब पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल, चार पिस्तुल, काडतुसांसह स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्याही जप्त केल्या आहेत. याप्रकरणी खरड (पंजाब) पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळचा असलेल्या सिकंदर शेखला अटक करण्यात आल्यामुळे कुस्तीक्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पंजाब पोलिसांनी शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क केल्याची माहितीही एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. इतर तीन जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचंही पोलिस तपासात समोर आलं आहे.

मोहालीत 24 ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी एक्सयूव्ही गाडीत दोन शस्त्रे घेऊन आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे द्यायचा प्लॅन होता. त्यानंतर सिकंदरने ही शस्त्रं नयागावातील कृष्ण उर्फ हैप्पी याला पोहोचवायची होती. पण त्याआधीच पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी 26 ऑक्टोबरne कृष्ण कुमार उर्फ हैप्पी यालाही बेड्या ठोकल्या.

सिकंदर शेख हा कोल्हापूरातील गंगावेश तालमीत सराव केलेला कुस्तीपटू असून, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी ही मानाची गदाही पटकावली होती. पण आता त्याच्या या अटकेमुळे कुस्तीविश्वात आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शेख हा बीए पदवीधर असून त्यानं आर्मीमध्ये क्रीडा कोट्यातून भरती झाला होता.पण काही काळानंतर नोकरी सोडत कुस्ती क्रीडा प्रकारात पुन्हा अॅक्टिव्ह झाला होता.

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असलेला सिकंदर शेख विवाहित आहे. तो गेल्या पाच महिन्यांपासून मुल्लांपुर गरीबदास येथे भाड्याच्या घरात वास्तव्याला होता. तो शस्त्रपुरवठा प्रकरणांत मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT