Rahul Gandhi Congress News Sarkarnama
महाराष्ट्र

Congress News : राहुल गांधींच्या लढ्याला महाराष्ट्रातून ताकद! 25 आमदार, 100 नेते दिल्लीत

25 Maharashtra Congress MLAs in Delhi : राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. आजच्या मोर्चात महाराष्ट्रातून तब्बल 100 नेते सहभागी होणार आहेत.

Roshan More

Rahul Gandhi Maharashtra Congress News : विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक आहेत. त्यांनी मागील चार दिवसांमध्ये जंतर मंतरजवळ तसेच आकाशवाणी केंद्राबाहेर जोरदार आंदोलन केले. आज ते सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा काढणार आहेत. इंडिया आघाडी देखील यामध्ये सहभागी आहे.

राहुल गांधींच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठी ताकद दिली आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसचे तब्बल 100 नेते दिल्लीत दाखल झाले आहे. यामध्ये 25 आमदार आणि खासदारांचा देखील समावेश आहे.

आज दुपारी १:३० वाजता,बाराखंबा जंक्शन, कनॉट प्लेस, नवी दिल्ली येथेन मोर्चा निघणार आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले की, लोकशाहीच्या रक्षणासाठी, न्यायाच्या लढाईसाठी, थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत धडक मोर्चा!

ट्विट करत वडेट्टीवार म्हणाले, वोट चोर कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ़्तर में! या बुलंद घोषणांनी आज महाराष्ट्र सदनाचा परिसर दणाणून गेला! जननेते राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने पाठिंबा दर्शवला.

मतचोरीच्या आरोपांविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी आवाज बुलंद करत, लोकशाहीच्या रक्षणाचा निर्धार व्यक्त केला.ना घाबरणार, ना झुकणार; लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढत राहणार, असे देखील ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT