

Delhi protest latest news : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पहिल्यांदाच केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांबाबत मोठा दावा केला आहे. ईडी, सीबीआय, परराष्ट्र मंत्रालय अशा विविध विभागांतील २०० अधिकारी आपल्यासोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे अधिकारी आपल्याला माहिती देत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
इंडिया आघाडीकडून सोमवारी सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांसह कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर विविध संघटना दिल्लीत आंदोलन करत आहेत. शनिवारी पोलिसांकडून हजारो आंदोलकांना ताब्यात घेतले. काहींना मारहाण झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
राहुल गांधी यांनी यापार्श्वभूमीवर सोमवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. सरकारने दिल्लीला तुरुंग बनविले आहे. सुमारे २० ते ३० हजार पोलीस रस्त्यावर होती. आम्हाला तेच हवे आहे. लोकांना दाखवून द्यायचे आहे की, सरकार ज्ञानेश कुमार यांचे संरक्षण करत आहे.
आम्ही आमच्यासाठी लढत नाही, देशातील लोकांसाठी लढतोय. जोपर्यंत संविधान सुरक्षित होत नाही. जोपर्यंत ज्ञानेश कुमार जात नाही, निवडणूक प्रक्रिया जोपर्यंत पारदर्शक होत नाही, तोपर्यंत देशातील युवक थांबणार नाहीत. काय करायचे असेल ते करा. देशाच्या आत्म्यावर त्यांनी हल्ला केला आहे. कितीही वेळ लागूद्या आम्ही आता थांबणार नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
ज्ञानेश कुमारांचे मेसेज
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे आहे. हे त्यांनाही माहिती आहे. ज्ञानेश कुमार यांच्या इतिहासाची माहिती आमच्याकडे आहे. थोडे थांबा. ही माहिती बाहेर येईल. असे राहुल म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांच्याकडून काही निरोप येतात का, असा प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी म्हणाला, आम्हाला मेसेजही येतात. आम्ही ज्ञानेश कुमार यांना माफीचा साक्षीदार होण्याचा सल्ला दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. तुम्ही राजीनामा देऊन सगळ्यातून बाहेर पडू शकता, काहीच अडचण नाही. तुम्ही मुख्य गुन्हेगार नाही. त्यांच्यावर नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा दबाव आहे, हे आम्हाला माहिती आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.
सुप्रीम कोर्टात याचिका
इंडिया आघाडीकडून आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. आम्ही सुप्रीम कोर्ट, सरन्यायाधीशांचा आदर करतो. त्यांनी आम्हाला मार्ग दाखविला आहे. त्यानुसार आम्ही याचिका दाखल करणार असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.