Maharashtra Legislative Council : महाराष्ट्राच्या विधिमंडळाला पुढच्या २ महिन्यांमध्ये तब्बल १६ नवे आमदार मिळणार आहेत. त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला आतापासूनच बाशिंग बांधले आहे. या १६ पैकी १४ विधानपरिषदेत आणि २ सदस्य विधानसभेसाठी निवडले जाणार आहेत. विशेष म्हणजे यातील काही ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया सुरु देखील झाली आहे.
महाराष्ट्राच्या विधानपरिषेतील विधानसभेतून निवडून गेलेल्या ९ आमदारांचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपत आहे. त्यासाठी १५ एप्रिलच्या आसपास निवडणूक जाहीर होणार आहे. याशिवाय काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांचीही जागा सध्या रिक्त आहे.
तर विधान परिषदेतीलच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातली पुणे, सोलापूर, सांगली-सातारा व रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातही निवडणूक होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात निवडणुकीसाठी तयारीही सुरु झाली आहे. या मतदारसंघातील मतदारांची यादी लवकरच निवडणूक आयोगाकडून (Election Commision) प्रसिद्ध केली जाऊ शकते.
याशिवाय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी आणि अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. कर्डिले यांचे १७ ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. नियमानुसार ६ महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्यानुसार १७ एप्रिलपूर्वी इथली निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.
याचवेळी बारामती मतदारसंघातही पोटनिवडणूक होऊ शकते असा अंदाज आहे. सध्या या दोन्ही मतदारसंघात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनची प्रक्रिया सुरु आहे. राहुरीमध्ये भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले तर बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील हे जवळपास अंतिम मानले जाते.
शिक्षक अन् पदवीधरचाही कार्यक्रम :
पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि नागपूर, संभाजीनगर, पुणे पदवीधर मतदारसंघातील आमदारांचाही कार्यकाळ ६ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे या ५ जागांसाठीही यावर्षीच्या दिवाळीदरम्यान निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.