

Mumbai News : राज्यसभेच्या राज्यातील सात जागेसाठी 16 मार्चला निवडणूक होत आहे. या सात जागांपैकी चार जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. या साठी भाजपने परत एकदा धक्कातंत्राचा अवलंब करीत दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्हयातील भाजपचे नेते व माजी आमदार रामराव वडकुते यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. वडकुते हे धनगर समाजाचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आवाज उठवला होता.
रामराव वडकुते यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेची संधी दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देवून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 7 वर्षांनी त्यांना भाजपने राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली आहे.
रामराव वडकुते यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत वडकुते यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव सातव यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने ही जागा त्यांच्याकडे घेतली.
रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छूक होते मात्र उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज होते. या नाराजीतून त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यापूर्वी 2002 मध्ये रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले होते.
कोण आहेत रामराव वडकुते?
रामराव वडकुते हे २०१४ ते २०१९ पर्यंत विधानपरिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार होते.
धनगर समाजाचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.धनगर आरक्षणासाठी त्यांनीही आवाज उठवला आहे.
रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवलं आहे.
परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले.
माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर त्यांनी धनगर समाजाच्या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले.
2002 मध्ये राष्ट्रवादीने वडकुते यांची महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
या नियुक्तीच्या काळातच त्यांनी महामंडळास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वडकुते यांचे गाव आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हा हे कार्यक्षेत्र राहिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.