Vidhan Bhavan Mumbai Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Legislature Ethics Committee: आमदारांनी कसं वागावं? वळसे पाटील, केसरकर, मुनगंटीवार ठरविणार

Maharashtra Legislature Forms Ethics Committee: विधानमंडळ समित्यांच्या दौऱयादरम्यान आमदारांचे आचरण कसे असावे, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह 9 सदस्यांचा समावेश केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

विधिमंडळ अंदाज समिती दौऱ्यावर असताना या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या कथित पीएच्या शासकीय निवासस्थानातील खोलीत १ कोटी ८० लाख रुपये सापडल्याच्या घटनेनंतर विधिमंडळाची नीतिमूल्य समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या प्रमुखपदी विधानसभेतील भाजप आमदार चैनसुख संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानमंडळ समित्यांच्या दौऱयादरम्यान आमदारांचे आचरण कसे असावे, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये शिवसेनेचे विधानसभा मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह 9 सदस्यांचा समावेश केला आहे.

विधिमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर असताना या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या सरकारी निवासस्थानी १ कोटी ८० लाख रुपयांची रोकड सापडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर विधिमंडळाची नीतिमूल्य समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीचे अध्यक्षज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती (भाजप) हे असतील. विधिमंडळाच्या विविध समित्यांच्या सदस्यांचे आचरण कसे असावे, याचे नीतीनियम समिती निश्चित करेल.

धुळ्याच्या या घटनेनेने राज्यात एकच खळबळ उडाली होती. विधानमंडळाचे कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तत्काळ निलंबित केले होते. किशोर पाटील यांच्या निलंबनाचा कालावधी ऑक्टोबरमध्ये संपल्यानंतर त्यांचे निलंबन आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात आले आहे. किशोर पाटील हे समितीचे अध्यक्ष खोतकर यांचे पीए म्हणून धुळ्याला गेले होते. धुळ्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते.

समितीचे सदस्य असे

विधानसभा सदस्य - अध्यक्ष-चैनसुख संचेती, सदस्य

दीपक केसरकर (शिंदेसेना), दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट), सुनील प्रभू (उद्धवसेना), अमिन पटेल (काँग्रेस) विधान परिषद सदस्य अमरिश पटेल (भाजप), रामराजे नाईक निंबाळकर (शरद पवार गट), सुधीर मुनगंटीवार, विजय देशमुख (भाजप),

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT