Ajit Pawar Death: मोठी बातमी: अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल; तांत्रिक बिघाड की लँडिंगचा अँगलच चुकला?

Ajit Pawar Plane Crash Primary Report: कोणत्याही विमान दुर्घटनेनंतर त्याची प्रोटोकॉलनुसार चौकशी केली जाते. त्याचप्रकारे अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता सुरु झाली आहे त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्याच काही निरीक्षण नोंदवण्यात आली आहे. यात मोठी माहिती समोर येत आहे.
Ajit Pawar Plane Carsh
Ajit Pawar Plane CarshSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar accident news: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज दहा दिवस होत आहे, त्यांचे विमान कसे कोसळलं या प्रश्नाचं उत्तर आजही अनुत्तरीत आहे. या अपघाताच्या चौकशीला आता वेग आला आहे. वैमानिकाचा अंदाच चुकला असल्याची माहिती चौकशी समितीतून समोर येत आहे. AAIB कडून हा तपास सुरु आहे.

बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अजितदादांचे विमान कोसळलं अन् या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अतिशय हायप्रोफाईल आणि गंभीर अशा या विमान अपघातांची तीन टप्प्यात चौकशी होत आहे.

कोणत्याही विमान दुर्घटनेनंतर त्याची प्रोटोकॉलनुसार चौकशी केली जाते. त्याचप्रकारे अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता सुरु झाली आहे त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्याच काही निरीक्षण नोंदवण्यात आली आहे. यात मोठी माहिती समोर येत आहे.

अजितदादांच्या विमान अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला नाही, असे सुत्रांनी सांगितले. या विमानाच्या लँडिंगचा अँगल चुकला होता, अशी माहिती समोर येत आहे. अपघाताचा प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Plane Carsh
Baramati Politics: 'माईं' ते 'वहिनी'; ६४ वर्षांनंतर महिलेच्या हाती धुरा! बारामतीत इतिहासाचे वर्तुळ पूर्ण होणार?

जेव्हा पायलटने लँडिग करण्याचा प्रयत्न करीत होता. तेव्हा नियंत्रण प्रणालीत अचानक काहीतरी विघाड झाला त्यामुळे लॅंडिग करण्याची दिशा चुकली असावी, अशी निरीक्षण या अहवालात नोंदवली गेली आहेत. हा संपूर्ण अहवाल येण्यास काही दिवस बाकी आहे, हा केवळ प्राथमिक अहवाल असून सखोल चौकशीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे, असे  प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

28 जानेवारीला हा अपघात झाला होता. हे विमान धावपट्टीच्या सुरवातीच्या डाव्या बाजूला कौसळलं होते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यांमधील डेटाचे सविस्तर विश्लेषण केले जाणार आहे.

Ajit Pawar Plane Carsh
Collector’s NA News: अत्यंत महत्त्वाचा निर्णय; आता NAसाठी कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही; रिअल इस्टेट प्रकल्प वेळेत सुरु होणार; कोण देणार परवानगी?

तांत्रिक बिघाड नेमका कोणत्या क्षणी सुरू झाला आणि वैमानिकाचे अखेरच्या क्षणी काय संभाषण झाले, यावरून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या सर्व तांत्रिक पुराव्यांच्या तपासणीनंतरच अपघाताचे अंतिम कारण स्पष्ट होईल. त्याला 10 ते 12 महिने लागण्याची शक्यता आहे.

विमान अपघाताची चौकशी डीजीसीए करीत आहे. चौकशीसाठी ‘डीजीसीए’ने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती आपला प्राथमिक चौकशी अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे. अजित पवार यांना विमान पुरवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेन्चर्स’ या कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com