नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
या हप्त्यासाठी १७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यातील सुमारे ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
Pune News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या ८ व्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून थकलेल्या नमो शेतकरी योजनेच्या आठवा हप्त्याच्या वितरणाला सरकारने मंजुरी देत शासन निर्णय जारी केला होता. तर यासाठी १ हजार ७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता ८ वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरीत केल्यानंतर एका आठवड्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जातो. मात्र पण पीएम किसानचा २१ वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरीत झाल्यानंतरही नमोचा आठवा हप्ता जमा झाला नाही.
दरम्यान राज्यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या ८ व्या हप्त्यासाठी तरतूद केली. याबाबत शासन निर्णय जारी करत रु. १,७७४ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. पण प्रत्यक्षात १, ८२० कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यापासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने निधी वितरणास मान्यता देताना तो कधी दिला जाईल याची माहिती दिली नव्हती. पण आता याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्यातील सुमारे ९० लाख ३४ हजार पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य म्हणून प्रति शेतकरी दरवर्षी रु. ६,००० अनुदान दिले जाते. तर यातच राज्य शासनाकडून आणखी रु. ६,००० इतकी भर घालण्यात आली आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी रु. १२,००० इतकी थेट मदत केली जाते.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता दिनांक १३ मार्च २०२६ रोजी वितरीत केला होता. पण यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वितरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता होती. मात्र वित्त विभागाच्या निधीच्या अडचणीमुळे नमोचा आठवा हप्ता अडकला. दरम्यान आतापर्यंतच्या सात हप्त्यांमधून राज्यातील पात्र लाखो शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असून आठव्या हप्त्यामुळेही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
1. नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता कधी मिळणार?
पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
2. किती निधी मंजूर झाला आहे?
१७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
3. किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे?
सुमारे ९० लाख ३४ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
4. पैसे कसे मिळतील?
थेट बँक खात्यात DBT द्वारे पैसे जमा केले जातील.
5. ही योजना कोणासाठी आहे?
राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.