Pradnya Satav Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: अर्ज भरताच आमदारकी निश्चित! कोणाला लागणार लॉटरी? काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या प्रज्ञा सातव पुन्हा विधानपरिषदेत दिसणार?

Hingoli News: विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेची पोटनिवडणूकसुद्धा 12 मे रोजी पार पडणार आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता. या पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्या विधानपरिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी तडकाफडकी 18 डिसेंबरला काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली होती. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसनं दुसऱ्यांदा आमदारकीची संधी दिली होती. मात्र, सगळे सुरळीत सुरु असतानाच त्यांनी अचानक विधान परिषद (MLC) सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा विधानभवन सचिवांकडे सोपवत त्याचदिवशी प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश केला होता.

विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेची पोटनिवडणूकसुद्धा 12 मे रोजी पार पडणार आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता. या पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळा सदस्यांचा कोटा असणार आहे. परंतू, बहुमत असलेल्या भाजपकडेच ही पोटनिवडणुकीची जागा जाण्याची दाट शक्यता आहे.

भाजपकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पण मोदी-शाह किंवा एकूणच भाजपच्या धक्कातंत्राची शैली पाहता काही वेगळा निर्णय होण्याची शक्यताही नाकारताही येत नाही. तसं झालं तर नेमकी कोणाला लॉटरी लागणार याबाबत तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. पण त्यातही प्रज्ञा सातव यांचं पारडं जड मानले जात आहे.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठीच्या निवडणुकीत 9 जागांसाठी स्वतंत्र मतदान, तर एका जागेसाठी स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी जितेंद्र भोळे तर काँग्रेसच्या आमदारकीवर पाणी सोडत भाजपप्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांच्या जागी होणाऱ्या निवडणुकीसाठी विलास आठवले निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे.

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 29 मतांचा कोटा तर प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी 144 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. 4 तारखेला पोटनिवडणुकीतील विजयी आमदारांनाही बारामती आणि राहुरी विधानसभेच्या उमेदवाराला मतदानाचा अधिकार मिळाल्यास 9 जागांसाठी मतांचा कोटा हा 29 तर प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी निवडून येण्यासाठी 145 मतांचा कोटा होणार आहे.

काँग्रेसकडून दुसर्‍यांदा संधी विधान परिषदेच्या आमदारकीची संधी मिळालेल्या प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत होता. पण त्यांनी सगळं सुरू असताना अचानकपणे आमदारकीचा राजीनामा देत भाजपप्रवेश केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली होती. पण आता सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यापासून त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्तच आहे. त्यातच आता येत्या महिनाभरात विधानपरिषदेतील 9 जागा रिक्त होत आहेत. 13 मे 2026 रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदार निवृत्त होत आहेत. त्यामुळे या 9 जागांसह प्रज्ञा सातव यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी दिल्यास त्या पुन्हा एकदा आमदार होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT