Kolhapur Transfer News: भाजप आमदाराची थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार,15 दिवसांतच वादग्रस्त अधिकाऱ्याची उचलबांगडी; 'गोकुळ'च्या राजकारणात खळबळ

Gokul Political News: गोकुळ दूध संघाच्या प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी सुजय कदम यांची 15 दिवसांतच बदली करण्यात आली आहे. अनेक संस्थांना बेकायदेशीररित्या क्लीन चिट दिल्याचा आरोप कदम यांच्यावर करण्यात येत होता.
Gokul Politics
Gokul Politics Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी सुजय कदम यांची 15 दिवसांतच बदली करण्यात आली आहे. अनेक संस्थांना बेकायदेशीररित्या क्लीन चिट दिल्याचा आरोप कदम यांच्यावर करण्यात येत होता. याबाबत चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांच्या मागणीला यश आल्याचं दिसून येत आहे. आता कदम यांची कोल्हापूरमधील शाहूवाडीमध्ये बदली करण्यात आली आहे.

गोकुळमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या होत्या आणि आमदार, भाजप नेत्यांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेतली होती. आरोप: तातडीच्या बदल्या, चुकीची प्रक्रिया आणि राजकीय दबावातून घेतलेल्या निर्णयांचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून, आता या प्रकरणाची पुढील चौकशी कोण करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे

कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या विविध प्रकरणातील आणि तक्रारीतील अभ्यास असणाऱ्या दुग्ध विभागातील सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्याजागी सावंतवाडी सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र, सुजय कदम यांचीही आता अवघ्या पंधरा दिवसांतच दुग्ध विभागातील सहायक निबंधक (दुग्ध) पदावरुन बदली करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गोकुळमधील अवसायन प्रकरण चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे. याचदरम्यान,एकापाठोपाठ पंधरा दिवसांतच दोन वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Gokul Politics
G Srikanth Transfer News: असे नाही, तर तसे आले, पण 'लाडके' जी. श्रीकांत 'पुन्हा आले'; CMकडे लावलेल्या 'फिल्डिंग'नं 12 दिवसांतच 'बदली' फिरवली

सध्या गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1200 सभासदांचा विषय ऐरणीवर आहे. यंदा गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 5 हजार 470 सभासदांची यादी दुग्ध विभागाकडे पाठवण्यात आली होती.

मात्र, या यादीतील बाराशे सभासद बेकायदेशीर आणि संसद असल्याची तक्रार दुग्ध निबंधक विभागीय पुणे कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. कडून पाठवलेल्या यादीवर एका दूध संस्था संचालकांनी हरकत घेतल्याने ठराव मागवण्याची प्रक्रिया स्थगित झाली होती.

Gokul Politics
Pune ZP News: अजितदादांच्या कारकिर्दीत जे जुळून आलं नाही, ते सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात घडलं, पुणे झेडपीचा 64 वर्षांचा इतिहास एका झटक्यात बदलला

दरम्यान, प्रदीप मालगावे यांच्या बदलीचे बुधवारी रात्री उशिरा आदेश काढण्यात आले होते. त्यांच्या ठिकाणी सावंतवाडीचे सहायक निबंधक सुजय कदम यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com