Vidhan Parishad Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra MLC Election: एकाच मतदारसंघातून दोन माजी आमदारांनी लावली विधान परिषदेसाठी जोरदार फिल्डिंग; कोण बाजी मारणार?

Maharashtra MLC election News: महायुतीमधील भाजपला विधान परिषदेच्या 5 जागा असल्याने पुण्यातील या मतदारसंघातून मुळीक यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून दोन दिग्गज नेत्यांनी आपली दावेदारीचा खुट्टा बळकट केली आहे.

एकीकडे भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळीक यांचे नाव जोरदार चर्चेत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार सुनील टिंगरे यांनीही विधान परिषदेसाठी आपली उमेदवारी जाहीरपणे मागणी केली आहे.

माजी आमदार सुनील टिंगरे यांनी याबाबत खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली आहे.आपली दावेदारी रीतसर कळवली आहे. यासोबतच इतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही पत्र पाठवून आपली मागणी नोंदवली आहे. या पत्रात टिंगरे यांनी पुणे आणि पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी तसेच पुण्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.

दुसरीकडे, भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळीक यांचे नाव देखील विधान परिषदेसाठी चर्चेत आहे. शरद पवारांच्या पक्षाचा आमदार असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघात भाजपची संघटना मजबूत करणे आवश्यक असल्याचे दाखवत मुळीक यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपली इच्छा व्यक्त केली असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीमधील भाजपला विधान परिषदेच्या 5 जागा असल्याने पुण्यातील या मतदारसंघातून मुळीक यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुळीक यांनी पक्षाच्या सूचनेवर उमेदवारी मागे घेतली होती, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचा वादा केला त्यांना असल्याचं देखील सांगितलं आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना पुन्हा सक्रिय करून घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीतील पार्श्वभूमी

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा गेल्या काही वर्षांत महायुतीमध्ये चर्चेत राहिला आहे. २०१४ ला जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांचा पराभव केला होता. आणि ते आमदार झाले होते त्यानंतर २०१९ मध्ये सुनील टिंगरे यांनी जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता.

२०२४ च्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात मुळीक यांना उमेदवारी नाकारण्यात आलं आणि टिंगरे उमेदवारी देण्यात आली. मात्र यांना पराभव स्वीकारावा लागला. आता विधान परिषदेच्या माध्यमातून दोन्ही नेते पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांना पक्षातील वरिष्ठांचा कौल नेमका कोणाला मिळणार हे पाहणार महत्त्वाचं ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT