MNS News: पुण्यात मनसेचा ‘रिवाइवल गेम’ सुरू! झिरो’ ते ‘हिरो’ मिशनसाठी राज 'पुत्र' मैदानात

Amit Thackeray Pune Visit: अमित ठाकरे सलग दुसऱ्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर येत आहेत. पिंपरी-चिंचवडपासून पुणे ग्रामीणपर्यंत गाव-तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत
Raj Thackeray, Amit thackeray
Raj Thackeray, Amit thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Amit Thackeray News: एकेकाळी पुणे महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सध्या पुण्यात अस्तित्वाच्या लढाई लढत आहे. 2012 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या या पक्षाला 2017 मध्ये अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं, तर 2026 च्या निवडणुकीत युती करूनही ‘भोपळा’ फोडता आला नाही.

या पार्श्वभूमीवर मनसेला पुन्हा उभं करण्यासाठी अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट ‘यंग कार्ड’ खेळत पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पुण्यात ‘झिरो’ झालेल्या मनसेला पुन्हा ‘हिरो’ बनवण्याचा हा प्लॅन सध्या अंमलात येताना दिसतोय.

अमित ठाकरे सलग दुसऱ्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर येत आहेत. पिंपरी-चिंचवडपासून पुणे ग्रामीणपर्यंत गाव-तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. केवळ सभा-मेळाव्यांपुरता मर्यादित न राहता ‘वन-टू-वन’ संवादावर भर देत ते संघटना पुन्हा घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Raj Thackeray, Amit thackeray
Koregaon Bhima Case: कोरेगाव-भीमा दंगल प्रकरण पुन्हा तापलं! आंबेडकरांच्या आरोपाने नवा ट्विस्ट; ‘फडणवीस सरकारचा कट’...

गेल्याच आठवड्यात त्यांनी पुण्यात तब्बल तीन दिवसांत सुमारे ३२ तासांच्या बैठका घेतल्या. शाखाध्यक्षांपासून शहर पातळीवरील नेत्यांपर्यंत शेकडो पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी संघटनाबांधणीतील त्रुटींवर थेट बोट ठेवलं. या मॅरेथॉन बैठकींमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनीची भावना निर्माण झाली असून, “आता काहीतरी बदल होणार” अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Raj Thackeray, Amit thackeray
Teacher Strike News: संप यशस्वी! अखेर सरकार नमले; शिक्षक संघटनांच्या लढ्याला यश, सोमवारपासून कार्यालये फुल्ल

या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून २५ आणि २६ एप्रिल रोजी नवी पेठेतील मनसेच्या मुख्य कार्यालयात सलग दोन दिवस बैठका होणार आहेत.या बैठकींना अमित ठाकरे यांच्यासोबत अविनाश अभ्यंकर आणि अमेय खोपकरही उपस्थित राहणार आहेत.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील सर्व पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संघटनाबांधणीची नवी दिशा ठरवली जाणार आहे. गावागावांत दौरे, स्थानिक पातळीवरील अ‍ॅक्टिव्हिटी आणि आगामी निवडणुकांची रणनीती याचंही नियोजन या बैठकीत होणार आहे. पुण्यातील मनसेची घसरलेली ताकद पुन्हा उभी राहणार का, आणि अमित ठाकरेंचा हा ‘रिवाइवल प्लॅन’ किती यशस्वी ठरणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com