Maharashtra Municipal Corporations Election Schedule Sarkarnama
महाराष्ट्र

Mahapalika Elections 2025: अखेर महापालिका निवडणुका जाहीर; मतदान, मतमोजणी कधी? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Maharashtra Municipal Elections : गेल्या ७ वर्षांपासून राज्यातील अनेक महापालिका निवडणूका रखडल्या होत्या. त्यामुळं सध्या सर्वच महापालिकांमध्ये प्रशासक कारभार पाहात आहेत.

Amit Ujagare

Maharashtra Municipal Corporations Election Date: राज्यातील गेल्या ७ वर्षांपासून रखडलेल्या आणि मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगानं आज (१५ डिसेंबर) जाहीर केला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

त्यानुसार राज्यातील मुदत संपलेल्या २७ महापालिकाची आणि नव्यानं तयार झालेल्या २ महापालिका अशा एकूण २९ महापालिकांसाठी या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ या दिवशी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ या दिवशी मतमोजणी पार पडेल.

आजपासून २९ महापालिकांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आता निवडणुका जाहीर झाल्यानं प्रचाराच्या कार्यक्रमांना वेग येणार आहे. घरोघरी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळणार आहे.

अशी असेल नियमावली

या निवडणुकांसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीनंच नामनिर्देशपत्र सादर करता येणार आहेत. राखीव जागांवर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. जर निवड झालेला उमेदवार सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करु शकला नाही तर त्याची निवड पूर्वलक्षी प्रभावानं रद्द होईल.

या निवडणुकांसाठी एकूण मतदार ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ आहेत. यांपैकी पुरुष मतदार १ कोटी ८१ लाख ९३ हजार ६६६ इतके आहेत. तर महिला मतदार १ कोटी ६६ लाख १९ हजार ७५५ तर इतर मतदार हे ४ हजार ५९० आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. एकूण २,८६९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

  • नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचा कालावधी : २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५

  • नामनिर्देशन पत्रांची छाननी : ३१ डिसेंबर २०२५

  • उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत : २ जानेवारी २०२६

  • निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर : ३ जानेवारी २०२६

  • मतदान दिनांक : १५ जानेवारी २०२६

  • मतमोजणीचा दिनांक : १६ जानेवारी २०२६

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT