Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Municipal Elections : 'नागपूर महापालिकेची सर्वांत खराब कामगिरी...' ऐन निवडणुकीच्या काळात समोर आलेल्या 'त्या' प्रतिज्ञापत्रामुळे CM फडणवीसांचं टेन्शन वाढलं

Maharashtra Waste NGT Report : महापालिका घन कचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार राज्य सरकारचा अंमलबजावणी अहवाल या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. असून यामध्ये स्थानिक स्वराज संस्थांतील कचऱ्याची हाताळणी आणि त्याचा पर्यावरण व आरोग्यावर होणारा परिणाम यावर भर देण्यात आला आहे.

Jagdish Patil

Maharashtra NGT report : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळू सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आपल्या प्रभागाचा विकास करणार, परिसरात स्वच्छता ठेवणाणर आणि कचऱ्याचं व्यवस्थापन करणार, अशी अनेक आश्वासनं देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र, आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्वच्छ महाराष्ट्र मिशनकडून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर (NGT) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून अनेक शहरातील महापालिकांचा ढिसाळ कारभार उघडकीस आला आहे.

राज्यातील घनकचरा व्यवस्थापन आणि वापरलेल्या पाण्यावरील प्रक्रिया याबाबतचा सहा महिन्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले होते. त्यानुसार, राज्यातील महापालिकांमध्ये निर्माण होणारा कचरा आणि त्यावर केली जाणारी प्रक्रिया यामध्ये तफावत मांडणारे प्रतिज्ञापत्र स्वच्छ महाराष्ट्र मिशनच्या संचालकांकडून सादर करण्यात आलं आहे.

या प्रतिज्ञापत्रानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर महापालिकेची कामगिरी राज्यात सर्वांत खराब ठरली आहे. त्यामुळे एकीकडे शहरं स्वच्छ ठेवण्याचं आश्वासन दिलं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र कचऱ्यावर प्रकिया केली जात नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

महापालिका घन कचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार राज्य सरकारचा अंमलबजावणी अहवाल या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. असून यामध्ये स्थानिक स्वराज संस्थांतील कचऱ्याची हाताळणी आणि त्याचा पर्यावरण व आरोग्यावर होणारा परिणाम यावर भर देण्यात आला आहे.

मात्र, यामध्ये नागपूर महापालिकेची कचरा प्रक्रियेची कामगिरी सर्वांत खराब ठरली आहे. इथे निर्माण होणारा कचरा आणि प्रक्रिया होणारा कचरा यात सर्वांत जास्त तफावत आढळून आली आहे. नागपुरात दररोज 1 हजार 52 टन कचऱ्यावर प्रक्रिया न करता त्याची विल्हेवाट लावली जात असल्याची धक्कादायक बाबा या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.

तर तिकडे मुंबई महापालिकाही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात पिछाडीवर असून तिथे दररोज 600 टन कचऱ्यावर प्रक्रिया न करता त्याची विल्हेवाट लावली जाते. दरम्यान, या आकडेवारीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेत कचरानिर्मिती आणि त्यावरील प्रक्रियेत तफावत नाही. मात्र, ठाणे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकांमध्ये ही तफावत जास्त असल्याचं समोर आलं आहे.

ठाण्याप्रमाणे पुणे महापालिकेची कामगिरी देखील चांगली असून पुण्यातही कचरा निर्मिती आणि प्रक्रिया होणारा कचरा यात जास्त तफावत आढळलेली नाही. परंतू पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र दररोज 280 टनांची तफावत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे आता ऐन महापालिकेच्या तोंडावर समोर आलेल्या या आकडेवारीमुळे नेत्यांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT