Kalyan Dombivli Mahapalika Election : एकीकडे आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधत प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र, दुसरीकडे भाजपच्या एका महिला उमेदवाराला या निवडणुकीत विजयी होण्यासठी अजिबात प्रचार करण्याची गरज भासणार नाही.
कारण या महिला उमेदवार निकालाआधीच विजयी झाल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपच्या प्रभाग क्रमांक 18 अ मधील उमेदवार रेखा राजन चौधरी या विजयी झाल्यात जमा आहेत.
कारण या जागेसाठी केवळ रेखा चौधरी यांनीच अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात इथे दुसऱ्या एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्याने आता रेखा चौधरी यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे.
खासदार श्रीकांत शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण-डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या राखीव जागेसाठी फक्त भाजपच्या उमेदवार रेखा राजन चौधरी यांचाच अर्ज प्राप्त झाला. इतर कोणत्या पक्षाने अथवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपाच्या रेखा चौधरी यांनी बिनविरोध झाली आहे.
तर 18 अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी रेखा चौधरी यांचा एकच अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिली. त्यामुळं निकालाआधीच त्या विजयी ठरल्या आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा 16 जानेवारीला होणार आहे.
तसंच प्रभाग क्रमांक 26-क मधून भाजपच्या आसावरी केदार नवरे या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत. इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने या दोन्ही जागांवर मतदानापूर्वीच भाजपचा विजय झाल्याचे चित्र आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दोन जागांवर थेट विजय मिळाल्याची माहिती मिळताच त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून ही बातमी दिली. त्यानंतर फडणवीस यांनी दोन्ही बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविकांचे अभिनंदन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.