Mumbai News : महाराष्ट्रात एकीकडे विधान परिषद आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.अशातच राज्य सरकारच्या गृहविभागाकडून राज्यातील तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या गुरुवारी (ता.30 एप्रिल)बदल्या करण्यात आल्या आहेत.
महायुती सरकारच्या काळात प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. सरकारकडून त्यात वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका कायम ठेवल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी सरकारच्या गृहविभागाने काढलेल्या आदेशानुसार अहिल्यानगर, परभणी, जालना, अमरावती, चंद्रपूर, नाशिक यांसह महत्वाच्या शहरांच्या पोलिस प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी सायंकाळी जारी केले. राज्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या महत्वाच्या मानल्या जात आहेत. शहरीसह,ग्रामीण भागातील पोलिस दलांतील पोलिस IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा यात समावेश आहे.
जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय के बन्सल यांची महाराष्ट्र सायबर सुरक्षणामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली मुंबईत पोलिस उपआयुक्तपदी झाली आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद यांच्याकडे धुळे पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची पोलिस महासंचालक कार्यालयात सहायक पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज मिलिंद तारे यांच्याकडे पुण्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची मुंबई शहर उपायुक्तपदी, लोहमार्ग पुणे पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांच्याकडे नंदुरबारच्या पोलिस अधीक्षकपदाचा चार्ज देण्यात आला आहे.
परभणीचे पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह एस परदेशी यांची मुंबई,राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त संदीप घुगे यांची मुंबई शहर,नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांची अपर पोलिस महासंचालक आणि सहायक पोलिस महानिरीक्षक अस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर म्हणून बदली झालीय.
राजकुमार शिंदे-पोलीस अधीक्षक,लोहमार्ग (पुणे)
निकेश खाटमोडे-पोलिस अधीक्षक,वाशिम
आयुष नोपानी- अप्पर पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण
पंकज कुमावत - पोलिस अधीक्षक, परभणी
निकेतन कदम - पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षक
सुरज गुंजाळ- मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक
गजानन राजमाने- मुंबई शहर,
दत्ता तोटेवाड- अमरावतीला अप्पर पोलिस अधीक्षक
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.