MLC Election 2026:मोठी बातमी: उद्धव ठाकरेंनी सपकाळांसह काँग्रेसच्या दिल्लीतील 2 बड्या नेत्यांना फिरवला 9 वेळा फोन, कारणही आलं समोर

Shivsena Vs Congress: विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देऊन ट्विस्ट आणणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. कारण अंबादास दानवेंची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या गोटात वेगानं हालचाली वाढल्या होत्या.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचं चित्रं आता स्पष्ट झालं आहे. विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीचा उमेदवारीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत आलं होतं.पण अखेरच्या टप्प्यात शिवसेनेत ठाकरेंनी अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करत मविआतील त्यांच्या मित्रपक्षांनाही धक्का दिला.

विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनाच पाठिंबा असं ठणकावून सांगितल्यानंतरही शिवसेनेनं आपली तिरपी चाल खेळत अंबादास दानवेंचं नाव पुढं केलं. या ठाकरेंच्या डावामुळे नाराज झालेल्या काँग्रेसनं थेट आपला उमेदवार देण्याच्या दृष्टीनं जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. पण आपल्या कडवट निष्ठावान शिवसैनिक असलेल्या दानवेंसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी स्वत: उद्धव ठाकरेंनीच सूत्रे हातात घेतल्याचं समोर येत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देऊन ट्विस्ट आणणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. कारण अंबादास दानवेंची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या गोटात वेगानं हालचाली वाढल्या होत्या. काँग्रेसमधील काही इच्छुकांची नावंही उमेदवारीसाठी चर्चेत आली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीनं दिल्लीत गाठत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याचं समोर आलं होतं.

यानंतर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे A फॉर्म मुंबईत पाठवण्याची जबाबदारी श्रीनिवास बिक्कड यांच्यावर सोपवण्यात आली होती. ते A फॅार्म घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याची माहितीही समोर आली होती. तसेच B Form मुंबईत दिला जाणार होता.

Ambadas Danve
Ambadas Danve News : मराठवाड्यात मशाल पेटती ठेवण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी दिले अंबादास दानवेंना बळ!

पण शिवसेनेच्या नेत्यांनी विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना गुरुवारी (ता.30) शिवसेना नेते काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी गांधी भवनात दाखल झाले. या भेटीवेळी एबी फॉर्म असलेले पाकिटच प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी थेट दानवेंच्या समोर टाकलं. यानंतर काँग्रेस विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं स्पष्ट झालं.

शिवसेना नेते अंबादास दानवेंच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रचंड कष्ट घ्यावे लागल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं गांधीभवनमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दोन ते अडीच तास बैठक चालल्याची चर्चा आहे. तसेच या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना 4 वेळा, रमेश चेन्निथला यांना 3 वेळा, के.सी.वेणूगोपाल यांना 2 वेळा फोन फिरवल्याचं समोर येत आहे.

Ambadas Danve
Neelam Gorhe News: 2002, 2008, 2014, 2020 अन् 2026 ! नीलम गोऱ्हेंना सलग पाचव्यांदा विधानपरिषद; ‘अ‍ॅडजस्टमेंट पॉलिटिक्स’ ची इनसाईड स्टोरी

काँग्रेसनं माघार घेत विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण याचवेळी काँग्रेसने विधान परिषदेसाठी उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर आता मविआतील जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी,राज्यसभेच्या उमेदवारीवरून नवा सुप्त संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने राज्यसभेची मागणी केली असली तरी,शिवसेनेने ती जागा आपल्याकडेच ठेवण्यावर भर दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच 'रोटेशन'नुसार यावेळची राज्यसभेची जागा शिवसेनेची असल्याचे संकेत दिले होते. शिवसेनेने महाविकास आघाडीत चर्चा न करताच विधान परिषदेसाठी उमेदवाराची घोषणा केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, नंतरच्या हालचालींमध्ये काँग्रेसने माघार घेण्याचे संकेत दिले आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com