Nashik Political News : Ajit Pawar : Manikrao Kokate Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजितदादांचे आमदार म्हणतात; '...तर आम्ही नालायक!'

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाची सरशी झाली असून राष्टवादी कांग्रेस अजित पवार गटाला अपयशाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर अजित पवार गटांतील नेते आणि आमदार पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षांकडे येण्यास तयार असून त्याबाबत संपर्क सुरु असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावर आता राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार पक्षांच्या आमदारांकडून प्रतिक्रिया येत आहेत. 

बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला आहे. निकालानंतर बारामतीचा निकाल फारच धक्कादायक होता, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. बारामतीच्या विजयानंतर सुप्रिया सुळें यांना अजित पवार गटातील काही आमदारांनी सुळेंना शुभेच्छा संदेश पाठवल्याचा दावा राष्टवादी कॉग्रेस शरद पवार पक्षकाडून  करण्यात आला आहे. त्यानंतर अजित पवारांचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 

अजित पवार यांच्या सोबत असलेले सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी सोडून गेलो तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असू असं कोकाटे म्हणाले आहे. अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक कोणीही नसेल,मात्र एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही कारण अजित पवार यांना सोडून जाण्यासाठी एक हि करणं आमच्यकडे नाही. आणि या काळात आम्ही जर अजित दादांना सोडलं, तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू असं कोकाटे म्हणाले. 

सिन्नर मतदारसंघाच्या विकासासाठी जेवढे पैसे अजित पवार यांनी दिले तेवढे पैसे कोणत्याच सरकारनं दिले नाहीत. अजित पवार यांना आमदार सोडून जाणार ह्या सर्व बातम्या चुकीच्या असून ह्या विरोधकांकडून अतिशय सोयीस्कर रित्या पसरवल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या झालेल्या बैठकीत अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. मात्र जे वक्तव्य रोहित पवार करत आहेत तो राजकीय डाव असू शकतो. अद्याप एकाही आमदाराच त्या अनुषंगानं माझ्यासोबत चर्चा झालेली नाही. अजित पवारांचे नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं आहे.", असं माणिकराव कोकाटें म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT