Raosaheb Danve : रावसाहेबांचा 'अजब अंदाज', पराभवानंतर देखील ...

Jalna Lok Sabha Election 2024 : दानवेंचा नादच खुळा, लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि दिल्लीत मोदी-शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दानवे यांनी मतदारसंघात आभार दौरा सुरू केला आहे
Raosaheb Danve
Raosaheb Danvesaerkarnama

Jalna News : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव रावसाहेब दानवे विसरलेले नाहीत. सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या लोकसभेच्या जालना मतदारसंघात यावेळी त्यांचा काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी तब्बल लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. विजयाची खात्री असल्यामुळे कल्याण काळे यांनी निकालाआधीच संपुर्ण जिल्ह्यात आभारा यात्रा काढली होती.

रावसाहेब दानवे यांचा मात्र नादच खुळा म्हणावा लागेल. लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि दिल्लीत मोदी-शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दानवे यांनी दोन दिवसांपासून मतदारसंघात आभार दौरा सुरू केला आहे. सिल्लोड-सोयगांव, फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली.

पराभवाने खचू नका, विधानसभा निवडणुकीच्या कामाला जोमाने लागा, मी खासदार नसलो तरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आवाहन ते या आभार दौऱ्यातून करत आहेत. 2019 मध्ये सव्वातीन लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलेल्या दानवे यांना या निवडणुकीत सहा पैकी एकाही विधानसभा मतदारंसघातून लीड मिळाली नाही.

घरच्या भोकरदनमध्ये दानवे पिछाडीवर गेल्यामुळे इतर मतदारसंघाचा विचार न केलेला बरा एवढ्या मोठ्या प्रमाणात यावेळी दानवेंच्या विरोधात मतदान झाले. महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या मंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे आपण दानवे यांच्या विरोधात काम केल्याची कबुली दिली. पैठणमध्ये दुसरे मंत्री आणि आता खासदार झालेले संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातही दानवे पिछाडीवर गेले.

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी आपली ताकद दानवेंना पाडण्यासाठी लावली होती हे लपून राहलेले नाही. भोकरदन मतदारंसघाची माहिती आपल्या समर्थकाकडून घेतानाचा खोतकर यांचा कथित आॅडिओ व्हायरल झाला आहे.

या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी काढेलला आभार दौरा हा भविष्यात सत्तार-भुमरे- खोतकर यांना धोकादायक ठरू शकतो. सोबत राहून दगा देणाऱ्या मित्र पक्षाच्या नेत्याना दानवे धडा शिकवतील आणि त्यासाठीच पराभवानंतरचा हा त्यांचा दौरा असल्याचे बोलले जाते.

Raosaheb Danve
Anil Deshmukh : फडणवीस-बावनकुळे जोडी फायदेशीर, देशमुखांच्या विधानाने उलटसुलट चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com