Maharashtra Politics : गृहमंत्री अमित शहा हे मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे पुण्यात आगमन झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी रायगडवरील कार्यक्रमासाठी रवाना झाले. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एकनाथ शिंदेंनी अमित शाहांची भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर आज (रविवारी) पुन्हा सकाळी एकनाथ शिंदे हे एकटेच शहा यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर गेले आहेत. अमित शहा हे 10 वाजता भोपाळला रवाना होणार होते. मात्र, या भेटीमुळे त्यांना आपल्या रवाना होण्याची वेळ पुढे ढकलावी लागली.
अर्थखात्याकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याने तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी अमित शहांकडे तक्रार केल्याची देखील माहिती आहे. मात्र,यावर मार्ग निघत नसल्याने ते आज पुन्हा अमित शाहांच्या भेटीसाठी गेल्याचे सांगितले जाते आहे. विशेष म्हणजे अमित शहा हे आज भोपळला रवाना होणार आहेत. ते रवाना होण्याची पूर्वी शिंदेंनी शहा यांची भेट घेतली.
रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा दावा आहे तर राष्ट्रावदी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळाले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नंतर पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली मात्र हे पद शिवसेनेला दिलेले नाही त्यामुळे शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. याची तक्रार देखील त्यांनी शहा यांच्याकडे केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थखात्यावर देखील एकनाथ शिंदे नाराज आहेत. आपल्या प्रकल्पांसाठी तसेच आपल्याकडे असलेल्या खात्यांसाठी अर्थखात्याकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याची शिंदेंच्या आमदारांची भावना आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करावी लागली तेव्हा प्रताप सरनाईक यांनी अर्थखात्याच्या भूमिकेवर जाहीर टीका केली.
अजित पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी शनिवारी संध्याकाळी सातारमध्ये होते. त्यांना माध्यम प्रतिनिधींनी त्यांची तक्रार शिंदेंनी अमित शहांकडे केली असल्याबाबत प्रश्न केला असताना ते म्हणाले, सुत्रांच्या हवाल्याने बातम्या देणे बंद करा. मी, अमितभाई, मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे दिवशभर सोबत होतो. अमितभाई मला काही म्हणाले नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.