Yashashri Munde, third daughter of late BJP leader Gopinath Munde, files nomination for bank election, Sarkarnama
महाराष्ट्र

Yashashri Munde: पंकजा, प्रीतम नंतर आता गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेकही राजकारणात; बँक निवडणुकीच्या रिंगणात

Yashashri Munde Files Nomination for Vaidyanath Bank Election: पंकजा मुंडे या सध्या राजकारणात सक्रिय आहेत. तर दुसरी कन्या प्रीतम या माजी खासदार आहेत, आता मुंडेंनी तिसरी कन्या यशश्री यांनीही राजकारणात एन्ट्री घेतली आहे.

Mangesh Mahale

मराठवाड्यातील मुंडे कुटुंबाचं महाराष्ट्राच्या राजकारण महत्व अधोरेखीत झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्यशैलीनं ठसा उमटला.

त्यानंतर त्यांची थोरली लेक, आमदार पंकजा मुंडे या सध्या राजकारणात सक्रिय आहेत. तर दुसरी कन्या प्रीतम या माजी खासदार आहेत, आता मुंडेंनी तिसरी कन्या यशश्री यांनीही राजकारणात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी वैद्यनाथ बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे.

यशश्री यांच्या उमेदवारीमुळे मुंडे घराण्याचा प्रभाव आणखी वाढण्याची चर्चा आहे. यशस्वी मुंडे यांनी बीडमधील परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यशस्वी यांच्यासोबत माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 10 ऑगस्टला वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जामुळे यशश्री मुंडे चर्चेत आल्या आहेत. यशश्री मुंडे या व्यावसायाने वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडन्ट म्हणून गौरवही करण्यात आला. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघींचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. तर यशश्री यांनी शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे.

  • वैद्यनाथ बँकेच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत आहे.

  • 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे.

  • अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यशस्वी मुंडे या भगिनींसह 71 अर्ज दाखल झाले.

  • 29 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT