Chandrakant Patil On Home Ministery sarkarnama
महाराष्ट्र

Chandrakant Patil: प्राचार्यांना मोठा दिलासा; निवृत्तीचे वय लवकरच होणार 65; उच्च शिक्षण मंत्र्यांकडून मोठी घोषणा

Retirement Age 65 for Principals in Maharashtra: "प्राचार्यांच्या निवृत्तीचं वय 62 वरुन 65 करण्यात येणार आहे. त्यामुळे 65 वर्षांपर्यंत सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे.या निर्णयामुळे उच्चशिक्षण क्षेत्रातील अनुभवसंपन्न व्यक्ती अधिक काळ कार्यरत राहणार आहेत,"

Mangesh Mahale
  1. सेवानिवृत्ती वयोमर्यादेत वाढ: महाराष्ट्रातील महाविद्यालयीन प्राचार्यांचे निवृत्ती वय 62 वरून 65 वर्षे करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

  2. शैक्षणिक सुधारणा चर्चेत: प्राचार्य संघटनेच्या अधिवेशनात शिक्षक भरती, नविन शैक्षणिक धोरण आणि नेतृत्वाखालील सुधारणांवर चर्चा झाली.

  3. नवीन शिक्षण पद्धतीचा आग्रह: व्यावसायिक, प्रात्यक्षिक आधारित शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मातृभाषेतील अभ्यासक्रम यावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

अनेक दिवसापासून प्राचार्यांच्या निवृत्तीच्या वयाचा मुद्दा चर्चेत आहे. निवृत्तीचे वय वाढविण्यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात येत होती, या मागणीचा विचार करुन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील प्राचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वर्षे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी घोषणा प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती येथे केली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशन ऑफ नॉन-गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ४० व्या वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "प्राचार्यांच्या निवृत्तीचं वय 62 वरुन 65 करण्यात येणार आहे. त्यामुळे 65 वर्षांपर्यंत सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे.या निर्णयामुळे उच्चशिक्षण क्षेत्रातील अनुभवसंपन्न व्यक्ती अधिक काळ कार्यरत राहणार आहेत,"

Chandrakant Patil announces increase in retirement age to 65 for college principals in Maharashtra.

प्राचार्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ, शिक्षक भरती आणि शैक्षणिक धोरणातील सुधारणा यावर या अधिवेशनात सविस्तर चर्चा करण्यात आली.प्राचार्यांच्या नेतृत्वातील शैक्षणिक सुधारणा, नव्या धोरणांची अंमलबजावणी आणि शिक्षकांच्या हिताच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या भविष्याचा आराखडा ठरवण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.

गेली वीस वर्षे प्राध्यापकांची भरती झाली नव्हती. ती आमच्या सरकारने केली आहे. शैक्षणिक धोरणावर चर्चा करणे आवश्यक असले, केवळ मागण्या मांडून चालणार नाही. बदलांसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले...

  • जगात सर्वात मोठा तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. पारंपरिक शिक्षणाऐवजी व्यावसायिक आणि प्रात्यक्षिक-आधारित शिक्षणाची आज गरज आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही गरज पूर्ण करेल.

  • विद्यार्थी हित जोपासून शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रस्थान मिळवून देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.

  • विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आधुनिक अभ्यासक्रम तयार करणे आणि मातृभाषेतून शिक्षण देणे आवश्यक आहे.

  • अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना कारखान्यात प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि सायंकाळी सैद्धांतिक अभ्यास अशी शिक्षण पद्धती राबवली जावी. यामुळे रोजगारनिर्मिती आणि संशोधनाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

❓ 4 FAQs with One-line Answers:

Q1: प्राचार्यांच्या निवृत्ती वयात काय बदल होणार आहे?
A1: प्राचार्यांचे निवृत्ती वय 62 वरून 65 वर्षांपर्यंत वाढवले जाणार आहे.

Q2: शिक्षणमंत्र्यांनी कोणत्या कार्यक्रमात ही घोषणा केली?
A2: अमरावतीतील प्राचार्य संघटनेच्या राज्य अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली.

Q3: नवीन शैक्षणिक धोरणावर भर कशावर आहे?
A3: व्यावसायिक, प्रात्यक्षिक-आधारित शिक्षण आणि मातृभाषेतील शिक्षणावर भर आहे.

Q4: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी काय प्रस्ताव आहे?
A4: विद्यार्थ्यांना कारखान्यांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि सायंकाळी सैद्धांतिक अभ्यासाची योजना सुचवण्यात आली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT