Devendra Fadanvis News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला होणार आहे. मात्र, याच दिवशी आयबीपीएस परीक्षा देखील आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. तसेच राज्य सेवेच्या परीक्षेत कृषी विभागाच्या 358 जागांचा समावेश नसल्याचे पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी जागांसाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे याच मुद्यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्ना बाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.आज दुपारी तीन वाजता एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत.तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. सर्व पदांची एकच परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांच्या मागणीला सुप्रिया सुळे यांनी समर्थन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री फोन करून आजच सांगते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विद्यार्थ्यांच्या मागणीची जबाबदारी फक्त एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही ती दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सत्तेतील तीनही पक्षांची आहे. तसेच वेळेवर परीक्षा घेतली पाहिजे आणि वेळेवर निकाल लागला पाहिजे. सात हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागला नाही. तो लवकरात लवकर लावावा, असे देखील सुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.