Kolhapur Politics: महायुतीला धक्का? दोन माजी जिल्हाध्यक्ष, एक माजी आमदार सोडचिठ्ठी देणार

Mahayuti meeting Kolhapur Samarjit Ghatge A Y Patil K P Patil: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील आणि माजी आमदार के पी पाटील हे मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील दोन माजी जिल्हाध्यक्ष आणि एक माजी आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे तीनही जण इच्छुक आहेत. महायुतीतून तिकीट मिळणार नसल्याचे संकेत असल्याने ते नाराज आहेत.

उद्या (गुरुवारी) महायुतीचा मेळावा तपोवन मैदान येथे होत आहेत. यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत. मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील आणि माजी आमदार के पी पाटील हे मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कागल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या आधीच त्यांनी आपल्या उमेदवाराची घोषणा करत प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र महायुतीकडून उमेदवारीची संकेत संपुष्टात आल्याचे कळताच त्यांनी अपक्ष किंवा इतर पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा पराभव करूनच आमदार होणार अशी शपथ त्यांनी दोन वर्षांपूर्वी घेतली आहे. राजकीय टोकाची ही निवडणूक होणार असून त्याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुश्रीफ विद्यमान आमदार असल्याने महायुतीतील जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार आहे. त्यामुळे महायुतीचे संभाव्य उमेदवार मुश्रीफ आहेत. त्यामुळे घाटगे गट नाराज असून येत्या दोनच दिवसात ते निर्णय घेणार आहेत. उद्या होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला समरजीत घाटगे उपस्थित राहणार का? याकडे कोल्हापूर जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

Kolhapur Politics
Sanjay Raut: गिरीश महाजन यांचं डोकं फिरलंय; संजय राऊत संतापले

राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर आहेत. महायुतीतील राष्ट्रवादीचे दोन्ही नेते माजी आमदार के पी पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

लोकसभा निवडणुकीत महत्त्वकांक्षा वाढल्याने ए वाय पाटील यांनी काँग्रेससोबत घरोबा सुरु केला. लोकसभा निवडणुकीनंतर उमेदवारी मिळवण्यासाठी के पी पाटील यांनी महाविकास आघाडीशी जवळीक साधली आहे. सध्या या दोघांनीही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे हे दोघेही उद्याच्या मेळाव्याला उपस्थिती लावणार का? असा सवाल आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com