Digital Satbara 7/12 News: महसूल विभागाने सातबारा बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक निर्णय घेत आता डिजिटल सातबारा उताऱ्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. डिजिटल सातबारा उताऱ्याला महसूल विभागाने कायदेशीर मान्यता दिली आहे.
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले आहेत. डिजिटल स्वाक्षरी, क्यूआर कोड व १६ अंकी पडताळणी क्रमांकासह असणारे ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग, न्यायालयीन कामकाजात कायदेशीर व वैध ठरणार आहे, याबाबत शासनाकडून परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
आता पंधरा रुपयांमध्ये अधिकृत डिजिटल सातबारा उतारा मिळणार आहे. या निर्णयात सर्वात महत्वाचे म्हणजे या या सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही आणि स्टॅंपची गरज लागणार नाही. डिजिटल स्वाक्षरी किंवा कोड तसंच सोळा अंकी पडताळणी क्रमांकासह हे सातबारा उपलब्ध होणार आहेत.
सातबारा घेण्यासाठी तलाठी-सज्जाच्या ऑफिसमध्ये फेरफटका माराव्या लागायचा
काही ठिकाणी चिरीमिरीशिवाय अधिकृत उतारा मिळत नसे
प्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक होती
तलाठ्याची स्वाक्षरी आणि स्टँपची आवश्यकता होती.
नव्या शासकीय परिपत्रकानुसारः
डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध होणार
१६ अंकी पडताळणी क्रमांक + QR कोड असणार
सर्व शासकीय, बँकिंग आणि न्यायालयीन कामांसाठी कायद्यानुसार वैध असणार
फक्त १५ रुपये शुल्क देऊन डाउनलोड करता येणार
तलाठ्याची स्वाक्षरी व स्टॅम्पची गरज नाही
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन महाभूमी पोर्टलवरून सहज डाउनलोड होणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
वेळ, पैसा आणि ऑफिसचे चकरा वाचणार आहेत.
एजंट आणि अनावश्यक त्रास संपणार
अधिकृत कागदपत्र मिळवणे सोपे आणि पारदर्शक होणार
डिजिटल प्रशासनाचा मोठा टप्पा पार पडणार
महाभूमी पोर्टलवर जा
digitalsatbara.mahabhumi.gov.in
→ तुमची मालमत्ता निवडा
→ डिजिटल पेमेंट करा
→ आणि त्वरित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 डाउनलोड करा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.