Shiv Sena UBT: उमेदवारी अर्जासाठी रेट ठरले; ठाकरेसेना पुण्यात किती रक्कम घेणार?

Shiv Sena UBT Nomination Form Price Pune: इच्छुकांच्या मुलाखतींना सात दिवसानंतर सुरुवात होणार आहे. उमेदवारांचे शिक्षण, त्याचे सामाजिक व शैक्षणिक कार्य, पक्षाच्या आंदोलनातील व बैठकातील सहभाग आदी माहितीचा समावेश उमेदवारी अर्जात असणार आहे.
Shiv Sena UBT Nomination Form Price Pune
Shiv Sena UBT Nomination Form Price PuneSarkarnama
Published on
Updated on

Pune News Shiv Sena UBT : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिका निवडणुकीसाठीच्या तयारीला सुरवात केली आहे. त्याच दृष्टिकोनातून आता काही पक्षांकडून इच्छुकांना उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील अशाच प्रकारे पुण्यामध्ये इच्छुकांना उमेदवारी अर्ज विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महानगरपालिका निवडणू‌कीसाठी शिवसेनेचे उमेदवारी अर्ज आज (गुरुवार 4 डिसेंबर) 2025 पासून ते 10 डिसेंबर पर्यंत शिवसेना पुणे शहर कार्यालय डेक्कन जिमखाना, येथे सशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि संजय मोरे म्हणाले, "आगामी महानगरपालिका निवडणूक शिवसेना संपूर्ण ताकदिनिशी लढणार आहे. सर्वसामान्य पुणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांवर शिवसेनेने सातत्याने आंदोलन केली आहेत. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविला आहे. सत्ताधा-यांच्या गळचेपी भूमिकेवर रस्त्यावर उतरलो आहे.

त्यांच्या चूकीच्या व भ्रष्ट कामकाजाला कायम विरोध केला आहे. नागरिकाना दिलासा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे उमेदवार इच्छुक असून महापालिकेच्या सभागृहात जाउन जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज आहेत.

Shiv Sena UBT Nomination Form Price Pune
Abdul Sattar News: इम्तियाज जलील यांनी दोस्ताना निभावला : सत्तारांच्या सिल्लोडकडे बघितलंही नाही; ना उमेदवार, सभा ना!

आजपासून दुपारी 3 ते 6 यावेळेत उमेदवारी अर्ज उपलब्ध होणार आहेत. उमेदवारी अर्जाची किंमत 500 रू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाची रक्कम 10 हजार रु शुल्क ठेवले आहे. शिवसेना जात पात मानत नसल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करतानाची रक्कम सर्वांना सारखीच असणार आहे.

उमेदवारी अर्ज विक्री पूर्ण झाल्यानंतर इच्छुकांच्या मुलाखतींना सात दिवसानंतर सुरुवात होणार आहे. उमेदवारांचे शिक्षण, त्याचे सामाजिक व शैक्षणिक कार्य, पक्षाच्या आंदोलनातील व बैठकातील सहभाग, जनसंपर्क, प्रभागात राबविलेले उपक्रम बार्बीच्या माहितीचा समावेश उमेदवारी अर्जात असणार आहे.

दरम्यान महाविकास आघाडी, युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. त्याबाबत जो आदेश येईल त्याचे पालन शिवसेना पुणे शहर करणार आहे. युतीबाबत पुर्व इतिहास पाहता भाजपने शिवसेने सोबतची युती ऐनवेळी तोडली होती. त्यामुळे पुणे शहर शिवसेना गाफिल न राहता पूर्ण तयारीत आहे. आणि युती आघाडी झाल्यास हि निवडणूक आम्ही सर्वजण सोबत लढविणार आहोत. असं ठाकरे सेनेकडून स्पष्ट करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com