Maharashtra Revised NPS: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने विविध मागण्यांसाठी गेल्या महिन्यात (21 एप्रिल) संप पुकारला होता. चार दिवस संप सुरु होता. आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला. त्यावेळी राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतनाच्या अंमलबजावणीची अधिसूचना पंधरा दिवसाच्या आत काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. हे आश्वासन सरकारने पाळले आहे.
आज याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. आज सरकारकडून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतनाच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. सरकारचा हा निर्णय निवृत्तीवेतन व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि आधुनिक बनवणारा आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे.
कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना बाजारभावावर पेन्शन आधारित न ठेवता शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन मिळावे ही मागणी होती, त्याबाबतीत फक्त आश्वासन मिळालेलं होतं परंतु लिखित स्वरूपात काही मिळाले नव्हते म्हणून राज्यभरात संप करण्यात आला होता, त्या संपाच्या अनुषंगाने पंधरा दिवसात निर्णय घेण्याबाबतचे लेखी दिलेले आश्वासन शासनाने पाळलेले आहे. त्यामुळे आता यापुढे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन घेण्याचा विकल्प घेणाऱ्या कर्मचाऱ्यास शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करण्यासाठी नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणि सुसूत्रता येणार आहे.
राज्यातील जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) अंतर्गत येतात, त्यांच्या योगदान, खाते व्यवस्थापन आणि निवृत्तीनंतरच्या प्रक्रियेबाबत स्पष्ट नियम ठरवण्यात आले आहेत.
पेन्शन प्रक्रिया सोप्या आणि स्पष्ट होणार
कर्मचाऱ्यांचा पैसा सुरक्षित राहणार
निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.